सामाजिक

गुन्हेगारांचे कर्दनकाळ ठरलेले पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांना पत्रकार संघाचा महाराष्ट्राचे राजरत्न हा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर 

बीड/प्रतिनिधी

बीड जिल्ह्यातील गुन्हेगारांचे खऱ्या अर्थाने कर्दनकाळ ठरलेले पहिले पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांना महाराष्ट्रराज्य पत्रकार संघ मुंबईच्या वतीने महाराष्ट्राचे राजरत्न – २०२६ हा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.पोलीस प्रशासनामध्ये सन २०१७ मध्ये देशसेवेचे स्वप्नउराशी घेऊन नवनीत कॉवत हे लोणावळा येथे एसडीपीओ म्हणून रुजू झाले.मेहनत आणि संघर्ष यावर ते धाराशिवचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक झाले.त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे पोलीस उपायुक्त म्हणून त्यांनी कार्य केले.

बीड जिल्हा संवेदनशील टप्प्यावर असताना दि.२१ डिसेंबर २०२४ पासून त्यांनी पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला अवघ्या एक वर्षाच्या कालावधीत त्यांनी बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडीत काढली असून बीड जिल्ह्यातील जातीय द्वेष आणि अशांतता दूर करत पुन्हा एकदा बीड जिल्ह्यामध्ये सामाजिक सलोखा उभा करण्याचे अवघड काम त्यांनी लिलयारित्या पार पाडले आहे.आई शिक्षिका आणि वडील भारतीय रेल्वेतून सेवानिवृत्त झालेले आहेत त्यांच्या आदर्श विचारांवर त्यांनी सुरू केलेले प्रशासकीय कामकाज उल्लेखनीय आणि प्रशंसनीय आहे.

याकरिता च महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या वतीने महाराष्ट्राचे राजरत्न – २०२६ हा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आला असल्याचे पत्रकार संघाचे प्रदेश संपर्कप्रमुख वैभव स्वामी आणि महिला जिल्हाध्यक्ष शेख आयेशा यांच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.सन्मानाचा हा राज्य स्तरीय पत्रकार संघाचा पुरस्कार जाहीर झाल्या बद्दल पोलीस प्रशासना सह बीड जिल्हा प्रशासन आणि सर्व स्तरातून पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांचे अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!