ब्राह्मण समाजातील गरजूंना लाभ देण्या साठी पदाचा वापर करणार – कॅप्टन आशिष दामले ब्राह्मण समाजाच्या इतर मागण्यांसाठी पाठपुरावा करणार – धनंजय कुलकर्णी

मुंबई/प्रतिनिधी
समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीच्या वतीने बदलापूर येथे राज्य समन्वयकांची बैठक घेण्यात आली.या बैठकीमध्ये ब्राह्मण समाजासाठी आता पर्यंत संघर्ष समितीच्या माध्यमातून अमृत परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे.
तसेच EWS आरक्षण वेद भूषण ला दहावी व वेद विभूषण बारावीचा दर्जा देण्यात आला असून वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक करून घेण्यात याव्यात यासाठी अशा काही मागण्या मान्य झाल्या असल्या तरी अजूनही ब्राह्मण समाजावर उठ सूट कोणीही टीका करतो यासाठी ब्राह्मण संरक्षण कायदा बनवण्यात यावा तसेच केजी टू पी जी शिक्षण मोफत करण्यात यावे प्रत्येक जिल्ह्यात ब्राह्मण समाजातील मुला-मुलीं साठीवस्तीगृह करण्यात यावे पुरोहितांना मासिक पाच हजार रुपये मानधन देण्यात यावे यासाठी पुन्हा संघर्ष समिती पाठपुरावा करेल असे संघर्ष समितीच्या बैठकीत ठरवण्यात आले परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले हे देखील या बैठकीत उपस्थित होते त्यांनी आर्थिक विकास महामंडळातून ब्राह्मण समाजासाठी गरजूना प्रामाणिकपणे मदत करू अशी आश्वासन देण्यात आले यावेळी संघर्ष समितीचे संस्थापक धनंजय कुलकर्णी,श्रीकांत जोशी,ईश्वर दीक्षित, अर्चना सरूडकर, अशोक वाघ आदी उपस्थित होते.
रविवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी क्लब हाऊस प्रसादम बदलापूर येथे समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीची बैठकघेण्यात आली यामध्ये ब्राह्मण समाजाच्या मागण्या साठी मागील अनेक वर्षापासून केलेल्या संघर्षाला पण म्हणून परशुराम आर्थिक विकास महामंडळ तसेच अमृत शिक्षण प्रशिक्षण संस्था ही देण्यात आली असली तरी अजूनही ब्राह्मण समाजाच्या अनेक समस्या तशाच आहेत.
यासाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे संस्थापक धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले तसेच वेळ पडल्यास पुन्हा आंदोलन करून असे दीपक रणनवरे यांनी सांगितले यावेळी कॅप्टन आशिष दामले परशुराम आर्थिक विकास महा मंडळाचे अध्यक्ष यांचा सत्कार संघर्ष समिती च्या वतीने करण्यात आला तसेच परशुराम आर्थिक विकास मंडळा कडून ब्राह्मण समाजा तील गरजूंना लवकरात लवकर करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.
यावेळी बोलताना कॅप्टन अशीष दामले यांनी सांगितले की, परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे प्रक्रिया जवळपास पूर्ण झालेली आहे त्या दोन महिन्यात महामंडळाचे लाभार्थी तयार होते यामध्ये व्यवसायासाठी 15 लाखापर्यंत व्याज परताव्याची योजना असेल देशांतर्गत शिक्षणासाठी दहा लाखापर्यंत कर्ज व्याज परतावा योजना आहे.
परदेशात शिक्षणासाठी 20 लाख रुपयापर्यंत व्याज परतावा योजना आहे,गट कर्ज 50 लाख रुपयापर्यंत असेल तसेच इतरही योजना आहेत ब्राह्मण समाजा तील गरजूंना आर्थिक विकास महामंडळा कडून कर्ज मंजूर झाल्यानंतर बँकांनी कर्ज द्यावे यासाठी उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आलेली असून नवउद्योजकांना नक्कीच कर्ज मिळेल असेही त्यांनी सांगितले पुरोहीतांना मानधनाचा विषय यासाठी काय करता येईल हे नक्कीच विश्वास पूर्ण माहिती घेऊन पुढे कार्य केले जाईल इतरही जे मुद्दे आहेत ते ब्राह्मण समाजातील समस्या सोडवण्यासाठी असल्यामुळे आपण आपल्या परीने प्रामाणिकपणे व निस्वार्थपणे पार पाडण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन कॅप्टन आशिष दामले यांनी दिला.
यावेळी मकरंद कुलकर्णी परभणी, पाटील साहेब पूर्णा, अनिल दीक्षित धुळे, उदय जोशी नंदुरबार, महेश अकोलकर,राहुल कुलकर्णी,विवेक बाभुळगावकर अंबाजोगाई धाराशिव येथील शिवराज आचार्य व त्यांचे सहकारी जालना येथील मधुसूदन दंडारे,संजय देशपांडे,महेश भालेराव, प्रज्ञा भिडे दादर, अविनाश समुद्रे ठाणे यांच्यासह अनेक राज्यस्तरीय सदस्य समन्वयक उपस्थित होते.
दि.12 ऑक्टोबर रोजी परशुराम लोटे येथे भगवान परशुराम यांचे चरणी नतमस्तक होऊन समस्त ब्राह्मण समाजाच्या इतर मागण्यांसाठी निश्चित पणे सरकार समोर मागण्या ठेवून मान्य करून घेण्यासाठी प्रयत्न केले जातील पाठपुरावा केला जाईल तसेच वेळ पडल्यास आंदोलनही केले जाईल असा ठराव या बैठकीत घेण्यात आला.



