राजकीय

भाजपाचे ज्येष्ठ नेते रमाकांत बापू मुंडे यांच्या वाढदिवसा निमीत्त केज येथे शुक्रवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन  

केज/प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टीचे माजी महाराष्ट्र कार्यकारीणी सदस्य तथा देवगावचे माजी सरपंच रमाकांत बापू मुंडे यांच्या वाढदिवसा निमीत्त केज येथे दि.५ सप्टेंबर शुक्रवार रोजी रक्तदान शिबीरासह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

केज तालुक्यातील देवगांव येथील रहिवाशी रमाकांत बाबूराव मुंडे हे गेल्या अनेक वर्षापासुन राजकीय क्षेत्रात करत त्यांनी देवगांव ग्राम पंचायतचा २५ वर्षे सरपंच पदाचा कार्यभार चालवला व पुढे त्यांनी स्व.लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली  माजी पंतप्रधान स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या उपस्थितीत बीड येथे भाजपा पक्षात प्रवेश केल्यापासुन ते आजपर्यंत भाजपा पक्षाचे एकनिष्ठतेने काम करत असताना स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांनी रमाकांत बापू मुंडे यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना महाराष्ट्र राज्याच्या कार्यकारिणीवर निवड करुन त्यांना पक्ष वाढ करण्याची जबाबदारी सोपविली होती.

पुढे रमाकांत बापू मुंडे यांच्या एकनिष्ठ कार्या मुळे स्व.मुंडे साहेबांनी विडा जिल्हा परिषद सर्कल गटातून बापूंच्या पत्नी सौ.उषाताई रमाकांत मुंडे यांना उमेदवारी देऊन त्यांना बहुमताने विजयी करुन दाखवले.स्व.मुंडे साहेबांच्या अकाली निधनानंतर रमाकांत बापू मुंडे हे माजी खा.प्रितमताई मुंडे व महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली एकनिष्ठपणे काम करत असलेले रमाकांत बापू मुंडे यांचा दि.५ सप्टेंबर शुक्रवार रोजी वाढदिवस असल्याने त्यांच्या वाढदिवसा निमीत्त केज येथील लक्ष्मी नर्गिंग स्कुलमध्ये रक्तदान शिबीरासह विविध कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहीती प्राचार्य रवि पवार व त्यांच्या सहकार्यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!