बाबुरावजी आडसकर महाविद्यालयात जिल्हा स्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न,आदित्य सूर्यवंशी प्रथम,काळे जान्हवी द्वितीय तर केकान प्रियंका तृतीय

केज/प्रतिनिधी
केज येथील बाबुरावजी आडसकर महाविद्यालयात आज दि.3/9/2025 रोजी जिल्हा स्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाली.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.माधवराव फावडे तर प्रमुख अतिथी म्हणून वस़ंत पतसंस्थेचे चेअरमन सुरेश शिनगारे हे होते.यावक्तृत्व स्पर्धेत लोकनेते माजी आमदार स्व. बाबुरावजी आडसकर यांचे कार्य व कर्तृत्व या विषयावर विद्यार्थ्यांनी विचारमंथन केले.केज तालुक्यातील व शहरातील विविध विद्यालयांनी सहभाग नोंदविला.या स्पर्धेत शालेय गटातुन प्रथम स्वामी विवेकानंद विद्यामंदिर केज चा आदित्य सुर्यवंशी प्रथम, छत्रपती शिवाजी विद्यालय आडस ची काळे जान्हवी द्वितीय तर जोगेश्वरी विद्यालय साखर कारखाना अंबाजोगाईची प्रियंका केकाण तृतीय तर रजत बोबडे उत्तेजनार्थ आला आहे.
महाविद्यालयीन गटातुन बाबुरावजी आडसकर महाविद्यालयाचा अशोक आचार्य प्रथम, सायली गायकवाड द्वितीय तर जोगदंड वैष्णवी तृतिय आलेली आहे. या स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून दोन्ही गटांसाठी डॉ.रामचंद्र केदार, डॉ.आशा बोबडे, डॉ.प्रकाश खुळे, डॉ.युवराज डोईफोडे, डॉ.बाबासाहेब हिरवे यांनी काम पाहिले. प्रास्ताविक डॉ.सुनिल राऊत,सुत्रसंचलन डॉ.प्रशांत क्षीरसागर तर आभारप्रदर्शन डॉ.आशा बोबडे यांनी केले.



