एम डी साठी ३ कोटी ८६ लाख रुपयांची फसवणूक करणारा आरोपी कराड येथुन जेरबंद,केज येथील सहाय्यक पोलीस अधीक्षक वेंकटराम यांच्या पथकाची दबंग कामगिरी

केज/प्रतिनिधी
नागपूर येथील सौरभ सुहास कुलकर्णी या ३ कोटी ८६ लाख ६१ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला केज येथील सहाय्यक पोलीस अधीक्षक वेंकटराम यांच्या पथकाने कराड येथे मंगळवार दि. १३ जानेवारी रोजी पहाटे ४ वाजता एका ट्रॅव्हल्स मधून प्रवास करीत असताना जेरबंद केले.
धारूर तालुक्यातील सोनिमोहा येथील रहिवासी असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश रामचंद्र तोंडे हे बारामती येथे कार्यरत असताना फेसबुक वर त्यांची नागपूर येथील सौरव सुहास कुलकर्णी याच्याशी ओळख झाली. आरोपी याने डॉ.तोंडे यांना मॅनेजमेंट कोठ्यातून एम डी मेडिसीन साठी प्रवेश मिळवून देतो म्हणुन ९९ लाख रुपये ३ वर्षाची फीस सांगून ६५ लाख रुपयात प्रवेश मिळवून देतो म्हणुन नगदी रोख व फोन पे द्वारे मिळून एकूण ८ लाख रुपये घेतले होते. परंतु पहिल्या यादीत डॉ. तोंडे यांचे कोणत्याच यादीत नाव आले नाही. त्यामुळे त्यांनी दिलेली रक्कम परत मागितली आसता,मी तुला पैसे देणार नाही, तुला काय करायचे ते करून घे म्हणुन सांगीतले होते. त्यानंतर धारूर पोलिसात सौरभ कुलकर्णी विरोधात दि. ९ डिसेंबर रोजी गून्हा नोंद झाला होता.
या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक वेंकटराम यानी करून बेंगलोर येथून कराड मार्गे पुण्याला जात असल्याची माहिती मिळविली व मंगळवारी पहाटे ४ वाजता कराड जि.सातारा येथील ट्रॅव्हल्सची झडती घेतली असता सौरभ कुलकर्णी याला पथकाने जेरबंद करून रात्री ७ वाजता केजला आणले.त्याला न्यायालया समोर हजर केले आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काॕवत,अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक वेंकटराम, पोलीस उपनिरीक्षक जावेद कराडकर,व आमिर इनामदार, जमादार अनिल मंदे यांच्या पथकाने केली आहे.

