सामाजिक

विज्ञानामुळे अंधश्रद्धा दुर होते – अॕड. उध्दवराव कराड

केज/प्रतिनिधी

गटशिक्षणाधिकारी कार्यालय केज व साने गुरुजी निवासी विद्यालय केज यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय केज तालुका स्तरीय बाल वैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनाचे समापन आज झाले या समापन प्रसंगी उपस्थित बाल वैज्ञानिकां ना मार्गदर्शन करताना बीड जिल्हा ऊसतोड कामगार विकास मंडळ केजचे अध्यक्ष अँड. उद्धवराव कराड यांनी सांगितले की,प्रयत्नांती परमेश्वर नसुन प्रयत्न हाच परमेश्वर असुन आपण सतत प्रयत्न केल्यास पाहिजे त्याचे संशोधन करून यशस्वी होऊ शकतो शोधाचा उपयोग कशा पद्धतीने करायचा हे कळले पाहिजे गरज ही शोधाची जननी आहे.

माणसाच्या जसजशा गरजा वाढत गेल्या तसतसे शोध लागलेले आहेत माणसाला सुखकर होईल असे उपकरण तयार केले पाहिजे या मुळे प्रगतीचे नव नवे टप्पे पार मानवाने पादाक्रांत केले आहे शिक्षणाचा जीवनामध्ये फार महत्त्व आहे विज्ञान प्रदर्शन हे तत्वावर व सिध्दांतवर आधारित आहे.विज्ञाना मुळे अंधश्रद्धा दूर होते विज्ञान प्रदर्शन म्हणजे हिरे शोधण्याचा प्रयत्न आहे यातुनच मोठे शास्त्रज्ञ निर्माण होते असे मार्गदर्शन केले.

या प्रसंगी व्यासपीठावर गट शिक्षणाधिकारी सर्वश्री सुनिल केंद्रे,साने गुरुजी संकुलाच्या प्राचार्या डॉ. कविता कराड मॅडम, विशेष शिक्षक वेदपाठक गणेश लक्ष्मणराव,भनगे सर,जोगदंड सर,लोकरे सर,राहुल शिंदे सर, मदने सर,सुनील कांबळे सर, ज्ञानोबा माने,श्रीमती बाराते मॅडम,साधनव्यक्ती श्रीमती रुपनर मॅडम, श्रीमती कदम मॅडम, वाघमारे,नयुम शेख आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्रीमती श्रुती लहाने यांनी केले तर आभार प्रदर्शन गुजर एल.जी यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!