मोजणी पूर्ण करूनच शिव रस्ते करावेत, शेतकऱ्यांकडे शेकडो एक्कर जमिनी नाहीत – डॉ.कदम अजय

केज/प्रतिनिधी
शेती हा भारतीय जीवनाचा कणा असून, शेतकरी हा देशाचा बाप आहे.असे आपण ऐकत आलो आहोत.गेल्याकाही दशकांपर्यंत हे खरे ही होते.आज परिस्थिती बदलेली आहे.सरकारने काढलेला शेतकरीहिताचा निर्णय प्रत्यक्ष मात्र शेतकऱ्यांच्या नरडीचा घोट घेणारा ठरत आहे. महसूल मंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे यांनी मागेल त्याला रस्ता.ही योजना सुरु केली आहे.
सात दिवसांत रस्ता.सर्वे नंबर बारा फुटांचा तर शिव रस्ता ३३ फुटांचा. यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत.राज्यात गेल्या १०० वर्षांत शेतीची मोजणी झाली नाही. शेतकरी बांध फोडत नाही तरीही काही वर्षांमध्ये हे बांध पाच-दहा फुट इकडे तिकडे सरकले नाहीत असे कोण म्हणू शकेल? अशावेळी जमीन मोजणी न करता रस्ते केले जात असतील तर कोण्यातरी एका शेतकर्याचे फार मोठे नुकसान होते.वाढती लोकसंख्या,बेरोजगारी आणि तेवढीच जमीन असल्यामुळे शेतीचे तुकडे पडत आहेत.अशावेळी जर शेतकऱ्यांच्या बांधा वरूनच हे रस्ते होणे गरजेचे आहे.रस्ता झाल्या मुळे त्याला फायदा होणार आहे.दळणवळण नीट होणार आहे.
शेतीसाठी लागणारी यंत्रे तो सहजपणाने घेऊन जाऊ शकणार आहे.हे सर्व त्याला समजते मात्र सात बारावर जमीन आहे आणि प्रत्यक्ष आपली जमीन रस्त्यात गेली आहे हे भविष्यात त्याला समजल्यावर त्याच्या मनाची काय अवस्था होईल? एक फूट बांधा साठी हा शेतकरी सुप्रीम कोर्टापर्यंत आपली बाजू मांडत असतो.हे फक्त शेतीवरचे त्यांचे प्रेमच नसते तर त्याच्या स्वभिमानाचा प्रश्न असतो. मला कुणाची एक इंच जमीन नको मात्र जीव गेला तरी माझी एक इंच जमीन मी दुसर्याला घेवू देणार नाही.अशी त्याची प्रांजळ भावना असते. गेल्या चार-पाच पिढ्यां पासून शेती करणारे कित्येक शेतकरी कधीही भूमि अभिलेख कार्यालयात गेले नाहीत.
आपल्या जमिनीची खरी कुंडली त्यांनी पहिलीच नाही.यापेक्षा भयंकर म्हणजे तलाठी कार्यालयात जाऊन आपली सातबारा वर्षानुवर्षे न घेतलेले शेतकरीही या राज्यात आहेत.एवढ्या गुण्या गोविंदाने नांदणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतीकडे कित्येकांच्या काकनजरा टक लावून बसलेल्या असतात. त्यातच भर म्हणजे या मागेल त्याला रस्ता या योजनेने पडली आहे,असे खेदाने म्हणावे लागत आहे.सरकार दरबारी जावून शेतकरी रस्ता मागत नाही आणि असा कोण शेतकरी आहे ज्याचा रस्ता लगेच मंजूर होतो.मात्र,असे रस्ते होत असतील तर तो त्याचे स्वागत करतो.
त्याची मागणी फक्त एकच असते की,माझ्या लेकरांच्या भाकरीवर या तुमच्या रस्त्याचा नकाशा काढू नका.तुम्ही जमीन मोजणी करा.दोन्ही सर्वे नंबरच्या मध्यातून हा रस्ता काढा. अशा आशयाचे निवेदन केज तालुक्यातील कदमवाडी या गावातील नागरिकांनी तहसिलदार साहेबाकडे दिले आहे.या वेळी कदम सुमित्राबाई सखाराम,कदम परमेश्वर, कदम विजय,कदम कैलास,कदम मंगेश. कदम वैजिनाथ,मुळे भागवत,शिंदे पद्माकर , कदम राजाराम,कदम अमर सतीश,कदम नरहरी तुकाराम,कदम श्रीराम आत्माराम हे सर्व शेतकरी उपस्थित होते.



