सामाजिक

केज नगरपंचायत गटनेते हरूनभाई इनामदार व आरपीआय (आ) तालुकाध्यक्ष सुनील हिरवे यांचा वाढदिवस व नववर्ष उत्साहात साजरा, आरपीआय (आ) च्या कार्यालयांमध्ये शुभेच्छांचा वर्षाव

केज/प्रतिनिधी

नवीन वर्षाच्या मंगलमय वातावरणात केज शहरात सामाजिक व राजकीय सौहार्दाचे दर्शन घडले. केज नगरपंचायतचे गट नेते हारूणभाई इनामदार तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले गट) केज तालुका अध्यक्ष सुनीलजी हिरवे यांच्या वाढदिवसानिमित्त केज शहरातील आरपीआय (आ) च्या कार्यालयांमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात शुभेच्छा समारंभाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमात दोन्ही तडफदार नेत्यांचा फुलांच्या भव्य हाराने सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवर व कार्यकर्त्यांनी पेढे वाटून आनंद साजरा करत नवीन वर्षाचे स्वागत केले. वाढदिवस आणि नववर्ष या दोन्ही आनंदाच्या क्षणांचे औचित्य साधून सामाजिक एकोप्याचे सकारात्मक चित्र निर्माण झाले.याप्रसंगीआरपीआय (आ) जिल्हा कार्याध्यक्ष संदीप तात्या हजारे,केज नगर पंचायतचच्या नगराध्यक्षा सीताताई बनसोड,आरपीआय (आ) मराठा आघाडीचे तालुकाध्यक्ष महादेव ढवारे पाटील,सुरेशजी बचुटे,माजी नगराध्यक्ष व्यंकटराव हजारे यांच्या सह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

केज नगरपंचायत गटनेते हारूणभाई इनामदार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना उपस्थितांनी त्यांच्या जनहितकारी कार्याचा गौरव केला. नगरपंचायत स्तरावर सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी ते सातत्याने कार्यरत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.तसेच आरपीआय (आ) गटाचे तालुकाध्यक्ष सुनीलजी हिरवे यांचा वाढदिवस ही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.केज तालुक्यात आरपीआय (आ) संघटना बळकट करण्यासाठी त्यांनी केलेल्या संघटनात्मक कार्याचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले.

यावेळी शुभेच्छा देताना संदीप तात्या हजारे, व्यंकटजी हजारे,सुरेशजी बचुटे,महादेव ढवारे पाटील,शैलेश हजारे यांची उपस्थिती होती.सर्व मान्यवरांनी दोन्ही नेत्यांना दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य व समाजसेवेत यश मिळावे अशा मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमामुळे नववर्षाच्या प्रारंभीच केज शहरात सकारात्मकता,सामाजिक सलोखा आणि राजकीय एकोपा अधिक दृढ झाल्याचे चित्र दिसून आले.कार्यक्रमाचा समारोप वाढदिवस व नववर्षाच्या शुभेच्छा, अभिनंदनाने करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!