मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.किशोर काळे यांची बोरफडी आदर्श ग्रामपंचायतला भेट

बीड/प्रतिनिधी
बीड तालुक्यातील आदर्श गाव मौजे बोरफडी येथे शुक्रवार दिनांक २६ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ७-०० वाजता मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतलेल्या आदर्श ग्रामपंचायत बोरफडी येथे भेट देऊन गावात राबविण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची पाहणी करण्यात आली यामध्ये प्लास्टिक बंदी, बचत गट,घरकुल, आयुष्यमान भारत कार्ड वाटप,अनिमिया मुक्त गाव,ग्रामपंचायत अंतर्गत सीसीटीव्ही कॅमेरे यांसह इतर खासकरून उपक्रम राबवलेले आहेत.
महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत राज्यात ३७३९७ ग्रामपंचायत तिने सहभाग नोंदवला आहे. जी ग्रामपंचायत उत्कृष्ट काम करील त्या घटकात त्या इंडिकेटर वरती काम करील त्यांना राज्यात पाच कोटी रुपयांचे बक्षीस मिळणार आहे.
यामध्ये राज्यस्तरीय जिल्हास्तरीय,तालुका स्तरीय बक्षीसास पात्र ग्रामपंचायत होणार आहे त्याच धर्तीवर आदर्श ग्राम पंचायत बोरफडीने देखील सहभाग नोंदवून सर्व इंडिकेटर पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे.त्याच अनुषंगाने ग्रामपंचायत बोरफडीचे दप्तर,नाविन्यपूर्ण केलेले कामे व नागरिकांना देत असलेल्या सुख सुविधा हे सर्व पाहण्यासाठी बीड जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. किशोर काळे यांनी त्यांच्या टीम सोबत भेट देऊन समाधान व्यक्त करून गावात शाश्वत विकास करण्याच्या सूचना दिल्या.
या वेळी त्यांच्यासोबत बीड पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अरुण मोरे, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचे वॉररूम सनियंत्रक तथा जिल्हा व्यवस्थापक अशोक खरसाडे आदि टीम सहित बोरफडी ग्रामपंचायत चे आदर्श सरपंच कैलास घुगे युवाउद्योजक सुनील कुटे, गोरख घुगे,वचिष्ठ कुटे, बिभीषण घुगे,जयवंत ठोंबरे, कृष्णा घुगे, रामभाऊ गाडे ,सिध्देश्वर घुगे यांच्या सह ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत अधिकारी विवेक गिते कृषीसहाय्यक खामकर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



