गप्पेवाडीतील बाराभाई व महादेव वस्ती रस्त्याच्या कामास सुरुवात,दत्तात्रय (पिंटू) ठोंबरे यांच्या हस्ते शुभारंभ

केज/प्रतिनिधी
विडा जिल्हा परिषद गटा तील गप्पेवाडी गावासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या विकास कामास अखेर सुरुवात झाली आहे. गप्पेवाडी येथील बाराभाई वस्ती आणि महादेव वस्ती येथील बहुप्रतीक्षित रस्त्याच्या कामाचा शुभारंभ विडा जिल्हा परिषद गटाचे भावी जिल्हा परिषद उमेदवार दत्तात्रय (पिंटू) ठोंबरे तसेच भावी पंचायत समिती उमेदवार सुरज पटाईत यांच्या माध्यमातून करण्यात आला.
या विकास कामासाठी गप्पेवाडी येथील युवा नेते अर्जुन केदार यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे हा प्रश्न मार्गी लागला असल्याचे सांगण्यात येत आहे. रस्त्याच्या कामाचा शुभारंभ श्रीफळ फोडून करण्यात आला.यावेळी रामदास केदार,बळीराम केदार,हनुमंत केदार, बबन केदार, पांडुरंग केदार, दत्तात्रय केदार,सचिन काळे,संतोष केदार,रमेश केदार,माजी सरपंच वचिष्ठ केदार,महादेव केदार,कृष्णा चौरे, चांगदेव केदार यांच्यासह ग्रामस्थ व तरुण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.



