महात्मा फुले युवा दला तर्फे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा बीड येथे भव्य सत्कार

बीड/प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार (जयभाऊ) गोरे यांचा महात्मा फुले युवा दलाच्या वतीने बीड येथे भव्यसत्कार करण्यात आला. दि.३ जानेवारी २०२६ रोजी नायगाव येथे आयोजित करण्यात येणाऱ्या ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले जयंती उत्सव सोहळ्याच्या तसेच ₹१४३ कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले स्मारकाच्या भूमिपूजन समारंभाच्या नियोजनासंदर्भात चर्चा करण्यासाठी मंत्री जयकुमार गोरे बीड येथे आले होते.
यावेळी बोलताना मंत्री जयकुमार गोरे यांनी नायगाव येथे होणाऱ्या या ऐतिहासिक कार्यक्रमास महाराष्ट्रातील सर्व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन केले.महात्मा फुले युवा दलाचे संस्थापक प्रमुख ॲड.सतीश शिंदे यांनी महाराष्ट्रभरातील महात्मा फुले युवा दलाचे सर्व कार्यकर्ते या कार्यक्रमा साठी उपस्थित राहतील असा शब्द जयकुमार गोरे यांना दिला.
या सत्कार प्रसंगी ॲड.सतीश शिंदे, ॲड.राजेंद्र राऊत,महात्मा फुले युवा दल बीड जिल्हा उपप्रमुख संजय काळे, पाटोदा तालुकाप्रमुख गणेश मोहळकर, सुलतानपूरचे सरपंच धनेश्वर खेत्रे,प्रदीप अण्णा गायकवाड,सचिन दुधाळ, मयूर आखाडे,धर्मराज दुधाळ,रमेश दुधाळ,संकेत गिरी,सुळ रमेश,सुधीर शिंदे,सुरेश राऊत यांच्या सह महात्मा फुले युवा दवाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.



