शैक्षणिक

आदर्श विद्यालय बनसारोळा शाळेचा शैक्षणिक सहलीचा उत्साहपूर्ण यशस्वी समारोप

केज/प्रतिनिधी

आदर्श विद्यालय बनसारोळा येथे यावर्षी भव्य शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले. दिनांक ६ डिसेंबर ते ११ डिसेंबर २०२५ यादरम्यान सहल उत्साहात पार पडली.एकूण१२०विद्यार्थी,१२ शिक्षक आणि २ शिक्षकेतर कर्मचारी यांचा सहलीत उत्स्फूर्त सहभाग होता.

सहली दरम्यान विद्यार्थ्यांनी राज्यातील महत्त्वपूर्ण धार्मिक, ऐतिहासिक आणि भौगोलिक स्थळांना भेट दिली. यात तुळापूर,आळंदी ,देहू, लोणावळा, पाली, मुरुड.-जंजिरा, अलिबाग बीच,हरिहरेश्वर,रायगड, प्रतापगड आणि महाबळेश्वर या ठिकाणांचा समावेश होता.या भेटींमुळे विद्यार्थ्यांचे ज्ञान,निरीक्षण शक्ती आणि इतिहास -भूगोला विषयीची समज अधिक दृढ झाली

.या संपूर्ण सहलीचे नेतृत्व साळुंके सर यांनी उत्कृष्टपणे केले.त्यांना प्रमोद मोरे,संतोष रोकडे, शिवाजी मांदळे,सुरज लोखंडे,जगन्नाथ काळे, मोरे मॅडम,येडले मॅडम, सरवदे मॅडम,यादव मॅडम, नरके मॅडम तसेच बाळासाहेब काकडे आणि गिरीधर जोगी यांचेमोलाचे सहकार्य लाभले.सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांची सुरक्षितता,शिस्त आणि मार्गदर्शन यांची उत्तम प्रकारे काळजी घेतली.

सहलभर विद्यार्थ्यांनी समूहचर्चा ,निरीक्षण, गीत-संगीत तसेच शैक्षणिक उपक्रमांचा भरपूर आनंद घेतला. भोजन व राहण्याची व्यवस्था उत्तम असल्याने सहलीचा आनंद अधिक वाढला.या यशस्वी सहलीस संस्थेचे अध्यक्ष अशोकराव काकडे,सचिव बालासाहेब काकडे आणि विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सिंधुताई चव्हाण यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. व्यवस्थापनाच्या पाठबळा मुळे संपूर्ण सहल उत्कृष्टरीत्या पार पडली.शैक्षणिक,सांस्कृतिक आणि ऐतिहासिक माहितीने समृद्ध अशी ही सहल विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय ठरली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!