
केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील साबला येथील समाज सेवक व आदर्श शिक्षक नरहरी काकडे यांच्या वाढदिवसानिमित्त एक उपक्रमात्मक सामाजिक कार्य राबविण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,आनंदवाडी वस्ती, साबला येथील सर्व विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्य तसेच खाऊचे वाटप करण्यात आले.
विद्यार्थ्यांमध्ये आनंदाची भावना पसरवत काकडे यांनी आपला वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा केला.या कार्यक्रमास विद्यालयाचे मुख्याध्यापक व सर्व सहशिक्षक उपस्थित होते.तसेच ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर पांचाळ,गणेश कटारे,रामचंद्र राऊत, लखन राऊत यांनीही उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविले.
सामाजिक बांधिलकी जपत शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित केलेल्या या उपक्रमाचे गावकऱ्यां कडून कौतुक करण्यात येत आहे.शालेय विद्यार्थी व शिक्षकांनी नरहरी काकडे यांच्या वाढदिवसा निमित्त त्यांना त्यांच्या दिर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.नरहरी काकडे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले आहेत.



