लाडेगाव,दीपेवडगाव, लाडेवडगाव,मुलेगाव येथील शेतकऱ्यांना उच्च दाबाने दररोज आठ तास वीजपुरवठा करण्याच्या मागणीसाठी होळ सब स्टेशनवर धरणे आंदोलन संपन्न ! धारूर उप कार्यकारी अभियंता श्री.गोकुळ मोरे कनिष्ठ अभियंता अभिजित पाटिल यांच्या लेखी आश्वासनाने क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे आंदोलन स्थगित!

केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील लाडेगाव ,दीपेवडगाव, लाडेवडगाव, मुलेगाव येथील शेतकऱ्यांच्या कृषिपंपाला तब्बल ३० व काही ठिकाणी ३६ तासा नंतर कमी दाबाने होत असलेल्या वीज पुरवठ्या मुळे शेतकऱ्यांचे रब्बी हंगामातील भिजवणे होत नसल्याने शेतकऱ्यांचे पिकांच्या अतोनात नुकसानीमुळे शेतकरी संतप्त झाले होते.दररोज उच्च दाबाने आठ तास वीज द्यावी,तसेच होळ ३३/११के.व्ही.विद्युत उपकेंद्रांतर्गत लाडेगाव, दिपेवडगाव,लाडेवडगाव, मुलेगाव येथील गावठाण व कृषी फीडर स्वतंत्र करुन वीज पुरवठा करण्यात यावा,होळ सब स्टेशनला 5MUA +10 MUA क्षमतेचे रोहित्र तात्काळ बसवण्यात यावे आदी.
प्रमुख मागण्यांसाठी गुरुवारी दि.११ डिसेंबर रोजी होळ ३३/११के.व्ही. विद्युत उपकेंद्रावर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांच्या नेतृत्वाखाली सकाळी ११ वाजल्या पासून दुपारी २ वाजेपर्यंत धरणे आंदोलन करण्यात आले.धारूर वीजवितरण उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता श्री.गोकुळ मोरे,कनिष्ठ अभियंता अभिजित पाटिल यांनी आंदोलकांच्या रास्त मागण्या मान्य करून पुढील तीन दिवसात वीज पुरवठा पूर्ण क्षमतेने देण्याचे लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले.
आंदोलनात बालाजी गुळभीले,अॕड.राजेश शिंदे,योगेश्वर अंबाड, दीपक अंबाड,हरिभाऊ आघाव,प्रमोद पांचाळ, राजाभाऊ सोमवंशी, संतोष शिंदे,सुशांतअंबाड, अंगद अंबाड सह लाडेगाव,दिपेवडगाव, लाडेवडगाव,मुलेगाव, होळ येथील शेकडो शेतकरी उपस्थित होते. आंदोलनस्थळी युसूफ वडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.भाजपा चे श्री.नेताजी शिंदे,राष्ट्रवादी काँग्रेस(शरदचंद्र पवार) पक्षाचे संभाजी लोमटे यांनी शेतकरी आंदोलनात सहभागी होऊन पाठिंबा दिला.



