
केज/प्रतिनिधी
केज तालुक्यात अद्याप इ केवायसी न केल्याने अनुदान प्राप्त झाले नाही अशा शेतकऱ्यांची एकूण संख्या 8548 इतकी आहे तसेच सदर शेतकऱ्यांचे एकूण 9.13 कोटी इतके अनुदान वाटप प्रलंबित आहे.त्यामुळे सर्व संबंधित प्रलंबित शेतकरी यांची इ केवायसी करून घेण्या साठी कॅम्प सर्व सीएससी केंद्रावर आणि ग्राम पंचायत स्तरावर आज पासून आयोजित केला आहे.
इ केवायसी पोर्टल हे सकाळी आणि सायंकाळी व्यवस्थित चालत असल्याने कृपया सकाळी लवकर आणि संध्याकाळी इ केवायसी करून घेण्यास सर्व शेतकऱ्यांना कळवावे. प्रलंबित इ केवायसी शेतकरी यांची यादी वाॕटस अप ग्रुपवर गाव निहाय शेअर करणार असल्याचे तहसीलदार राजेश गिड्डे यांनी सांगितले आहे.



