सामाजिक

केज तालुक्यात मोठ्या प्रमाणात घनकचरा व्यवस्थापन व जलजीवन कामात बोगसगीरी – रोहित कसबे 

केज/प्रतिनिधी

शिवसेना जिल्हा सचिव रोहित कसबे यांनी केज पंचायत समितीचे गट विकास अधिकारी नागरगोजे साहेब यांची भेट घेऊन केज तालुक्यातील बहुतांश गावी घनकचरा व जलजीवनचे कामे बोगस प्रकारे झाले आहे. तसेच घनकचरा व्यवस्थापन व जलजीवन सन 2023 -24,24- 25 सर्वकामांची जबाबदार प्रशासकीय अधिकारी यांच्या समवेत तपासणी करण्यात यावी तसेच या सर्व कामाची माहिती आठ दिवसात आम्हाला देण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल .

शासनाचा भरघोस निधी या कामांसाठी गावागावात पोहोचला होता परंतु चुकीच्या पद्धतीने आणि बोगस कामे करून बिल उचलण्याची देखील काम झालेले आहेत असे जाणवत आहे. तशा प्रकारच्या तक्रारी आल्या आहेत तरी नागरगोजे साहेबांनी याप्रकरणी लक्ष घालून लवकरात लवकर निवेदनाची दखल घ्यावी अशी लेखी निवेदनाद्वारे विनंती करण्यात आली.

जर या प्रकरणात सखोल चौकशी नाही झाली तर पुढील आठ दिवसाच्या नंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवसेना जिल्हा सचिव रोहित कसबे हे तीव्र आंदोलन करणार असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे आणि आंदोलनाची सर्व जबाबदारी ही प्रशासकीय अधिकारीची यांची असेल असे देखील नमूद करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!