अध्यात्मिकसामाजिक

केज तालुक्यातील बोरगाव बु येथे प्रति जेजुरी असलेल्या खंडोबा देवाची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न.

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील बोरगाव बु येथे प्रतिजेजुरी असलेल्या खंडोबा देवाची यात्रा मोठ्या उत्साहात जल्लोषात संपन्न झाली. यात्रेमध्ये खंडोबा देवाची पालखी संपूर्ण गावामध्ये ढोल,हलगी व ह.भ.प. गणेश महाराज यांच्या टाळ,मृदंगाच्या गजरात मिरवण्यात आली.नंतर गावातील खंडोबा देवाचे वसारी धारक असलेले गोपाळ देव निंगुळे,रमेश वळेकर,दादा आरकडे, हरिभाऊ आरकडे, बालाजी मुसळे यांच्या सहकार्याने अशोक डिसले यांच्या हस्ते खंडोबा देवाचा लंगर तोडण्यात आला.

व मल्हारी मार्तंडच्या गजरात खोबरे,भंडारा उधळण्यात आला. गावातील सर्वनागरिकांनी यात्रेचा व भव्य महाप्रसादाचा लाभ घेतला.अशा प्रकारे प्रति वर्षी प्रमाणे प्रति जेजुरी असलेल्या खंडोबा देवाची यात्रा संपन्नझाली.यासाठी सहकार्य म्हणून गावातील तरुणवर्गाचे व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीचे आणि अहिल्या प्रबोधिनी मंचाचे अध्यक्ष दीपक रमेश होळकर यांचे सहकार्य मिळाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!