आदर्श विद्यालय बनसारोळा येथे संविधान दिनानिमित्त आयोजित चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव


केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील बनसारोळा येथील आदर्श विद्यालयात संविधान दिनाचे औचित्य साधून चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग मिळाला असून निवड झालेल्या विजेत्यांचा दि.२१नोव्हेंबर रोजी झालेल्या समारंभात गौरव करण्यात आला.
बक्षीस वितरण सोहळा शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.चव्हाण मॅडम तसेच साळुंखे सर व अंबाडसर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.मान्यवरांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे व बक्षिसे प्रदान करण्यात आली.
मोठा गट-विजेते प्रथम पारितोषिक -अक्षरा अमोल गोरे,द्वितीय पारितोषिक -प्राची महादेव पौळ,लहान गट विजेते प्रथम पारितोषिक मयुरी नंदकिशोर लुगडे, द्वितीय पारितोषिक – विश्वजीत बाळासाहेब सोनके या स्पर्धेसाठीची बक्षिसे शाळेचे सहशिक्षक लोखंडे सर आणि कापसे सर यांनी प्रेमपूर्वक उपलब्ध करून दिली. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याचा हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.



