सामाजिक

भारतीय जनता मजदूर संघाकडून चार श्रम संहितांच्या ऐतिहासिक अंमलबजावणी बाबत भारत सरकारचे स्वागत – श्री शांतप्रकाशजी जाधव

नवी दिल्ली/प्रतिनिधी

भारत सरकारने दि.21 नोव्हेंबर 2025 पासून देशभरात चार श्रम संहितांची अंमलबजावणी करण्याचा घेतलेला ऐतिहासिक निर्णयाचे भारतीय जनता मजदूर संघाने (BJMS) उत्साहाने स्वागत केले आहे.भारतीय जनता मजदुर संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.शांतप्रकाशजी जाटव यांनी पत्रकारांशी बोलताना सरकारचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

या चार श्रम संहितांमध्ये 

1.वेतन संहिता 2019

2.औद्योगिक संबंध संहिता 2020

3.सामाजिक सुरक्षा संहिता 2020 आणि

4.व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य व कार्यपरिस्थिती संहिता 2020 यांचा समावेश आहे.

शांत प्रकाश जाटव यांनी सांगितले की,या संहितां मुळे देशातील कोट्यवधी कामगारांच्या जीवन मानात वास्तविक सुधारणा घडणार असून श्रमिक संरक्षण,पारदर्शक वेतनव्यवस्था,सामाजिक सुरक्षा आणि सुरक्षित कामकाजाचे वातावरण निर्माण होणार आहे.

ऐतिहासिक आणि श्रमिक हिताचे पाऊल  श्री शांत प्रकाशजी जाटव सरकारच्या निर्णयाचे कौतुक करताना श्री. शांतप्रकाशजी जाटव म्हणाले की,“चारही श्रम संहितांच्या अंमल बजावणी नंतर देशाचा संपूर्ण श्रम तंत्र अधिक आधुनिक,सुरक्षित आणि पारदर्शक बनले आहे.गिग वर्कर,प्लॅटफॉर्म वर्कर, महिला,युवक आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांना पहिल्यांदाच वास्तविक सामाजिक सुरक्षा मिळू लागेल.हा निर्णय न्यायपूर्ण श्रम व्यवस्थेच्या दिशेने मोठा टप्पा आहे.”

संहितांमुळे होणारे प्रमुख लाभ देशातील सर्व कामगारां साठी किमान वेतनाची हमी,नियुक्ती पत्र अनिवार्य, पारदर्शकतेला चालना,गिग व प्लॅटफॉर्म वर्करांना प्रथमच सामाजिक सुरक्षा मिळणार आहे,महिलांना सुरक्षिततेसह रात्रीच्या पाळीत कामाची संधी,

सर्व कर्मचाऱ्यांसाठी वार्षिक मोफत आरोग्य तपासणी, देशभरात ESIC कव्हरेजचा विस्तार, वेळेवर वेतन देणे बंधन कारक असणार आहे, कंत्राटी श्रमिकांनाही समान सुरक्षा,उद्योगां साठी सिंगल रजिस्ट्रेशन आणि सिंगल लायसन्स मुळे सुलभ अनुपालन होणार आहे.

भारतीय जनता मजदुर संघाचा जागरूकता अभियानाचा संकल्प नवीन संहितांची माहिती देशातील प्रत्येक कामगारापर्यंत पोहोंचावी यासाठी भारतीय जनता मजदूर संघ देशव्यापी जन जागृती मोहीम राबवणार आहे असे श्री.शांत प्रकाश जी जाटव यांनी सांगितले.

संगठित किंवा असंघटित सर्वच क्षेत्रांतील कामगारांना त्यांच्या नवीन हक्कांची जाणीव करून देणे हा आमचा संकल्प आहे.आत्मनिर्भर भारताच्या दिशेने हे पाऊल महत्त्वाचे आहे असे त्यांनी सांगितले.केंद्र सरकारच्या या निर्णयाचे भारतीय जनता मजदुर संघाचे राष्ट्रीय सचिव भाऊसाहेब घोडके, महाराष्ट्र राज्य सचिव धनंजय कुलकर्णी, मराठवाडा सचिव चंद्रकांत पाटील यांनी स्वागत केले आहे.व भारत सरकारचे आभार व्यक्त केले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!