सामाजिक

क्रांतीनगर येथे टीपू सुलतान यांची जयंती उत्साहात साजरी

केज/प्रतिनिधी

केज येथे २० नोव्हेंबर गुरुवार रोजी शेर ए मैसूर, शेर ए हिंदुस्तान म्हणून ज्यांची जगभर ख्याती आहे असे हजरत टिपू सुलतान यांची जयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली.यावेळी क्रांती नगर भागातील प्रचंड मोठा जनसमुदाय उपस्थित होता.येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

विधवा महिलांना स्वेटर व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत,वैचारिक ठेवा जपत यावेळी आगळी वेगळी जयंती साजरी करण्यात आली.जयंतीचे अध्यक्ष इरफान पठाण यांनी व त्यांच्या संपूर्ण टीमने जयंती साजरी करण्या साठी अथक परिश्रम घेतले.यावेळी केजच्या नगराध्यक्षा डॉ.सीताताई बनसोड या उपस्थित होत्या.त्याचप्रमाणे क्रांती नगरचे नगरसेवक अजहर भाई इनामदार हे देखील यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. सीताताई बनसोड म्हणाल्या की,या जयंतीचे वेगळेपण म्हणजे डी.जे. मिरवणूक न काढता सामाजिक भान ठेवून गरजूंना मदत करून ही जयंती साजरी होत आहे. याबद्दल येथील नियोजन कमिटीचे विशेष कौतुक केल या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असलेले व्याख्याते प्राध्यापक डॉ. सिद्धार्थ शिनगारे हे होते. आपल्या व्याख्यानामध्ये त्यांनी हजरत टिपू सुलतान यांच्या विषयी विस्तृत अशी माहिती सांगताना म्हणाले की, टिपू सुलतान यांची जयंती साजरी करणे ही सर्व धर्मीयांची जबाबदारी आहे.पुढे बोलताना ते म्हणाले की,हजरत टिपू सुलतान हे या भारत भूमीचे भूमिपुत्र आहेत.ते बाहेरून आलेले नाहीत. मुस्लिम समाज सर्वधर्म समभाव पाळतात. मशिदी मध्ये सर्वांना प्रवेश दिला जातोय.त्यावेळेस दलित स्त्रियांना हीनतेची वागणूक दिली जायची, परंतु हैदरअली म्हणजेच हजरत टिपू सुलतान यांचे वडील यांनी कोणालाही अर्धनग्न राहण्याची बळजबरी करू नये असा नियम काढून स्त्रियांचा आदर केला.अछुत, अस्पृशतेला त्यांनी आपल्या राज्यामध्ये कधी थारा दिला नाही.

शेतीमध्ये अनेक सुधार करण्याचे कार्य हजरत टिपू सुलतान यांच्या राज्यामध्ये झालेले पाहायला मिळते.भारता मध्ये युद्धामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर उत्तम प्रकारे केला जाऊ शकतो,याचा प्रत्यय हजरत टिपू सुलतान यांनी करून दिलेला आहे.टिपू सुलतान यांच्याकडे दोन हजार पुस्तके होती. यावरून ते किती गाढे अभ्यासक होते हे लक्षात येईल.सदरील कार्यक्रमा साठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.हारुणभाई इनामदार (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट) हे देखील उपस्थित होते.आझाद क्रांती सेनेचे सेनानायक राजेश भाऊ घोडे हे देखील या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. ज्येष्ठ मार्गदर्शक बाबुराव गालफाडे, आझाद क्रांती सेनेचे केज तालुकाध्यक्ष शरद थोरात, आझादक्रांती सेनेचे उपशहर प्रमुख अनिल लोखंडे, सामाजिक कार्यकर्ते लखन हजारे, शितलताई लांडगे (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट महिला तालुकाध्यक्ष),सामाजिक कार्यकर्ते रोहित कसबे, सामाजिक कार्यकर्ते योगेश गायकवाड,दलित महासंघाचे तालुकाध्यक्ष विनायकरावजी लोंढे, कयूम तांबोळी,अजिंक्य माने,अजय गालफाडे, प्रेम गायकवाड,त्याच प्रमाणे पत्रकार पांडुरंग कसबे,हजरत टिपू सुलतान जयंती उत्सव कमिटीचे अध्यक्ष इरफान पठाणआझाद क्रांती सेना शहरप्रमुख,उपाध्यक्ष अमन पठाण,सचिव साहिल तांबोळी, कोषाध्यक्ष वाहेद तांबोळी व सुलतान कंपनीचे सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!