केज येथे चंपाषष्टी निमित्त लंगर तोडण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन.

केज/प्रतिनिधी

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी केज येथे चंपाषष्ठी निमित्त लंगर तोडण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.केज शहरामध्ये खंडोबा मंदीर परिसर येथे चंपाषष्ठी निमित्त वारूवाल्याचे, आराधी वाल्याचे असे प्रत्येक वर्षी कार्यक्रम होतात अहिल्या नगर येथील मंदीरात लंगर तोडणे,वाघ्या मुरळी, गोंधळी,आराधी मंडळ यांचे कार्यक्रम दरवर्षी प्रमाणे होणार असून पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी कार्यक्रमाचा तसेच महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन बिभीषण गाढवे तसेच शिवाजी चेपट यांनी केले असून .
या कार्यक्रमात लंगर तोडला जातो, वारूवाले वसारी खेळतात,आराध्याची गाणी होतात आणी चंपाषष्ठी निमित्त मोठा भंडारा म्हणजेच जेवणाचा आणि महा प्रसादाचा कार्यक्रम होतो तरी पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ आवश्य घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात येत आहे.



