शैक्षणिक

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कुंबेफळ शाळेत बालदिन उत्साहात साजरा

केज/प्रतिनिधी

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कुंबेफळ केंद्र केज मुलांची ता.केज शाळेत दि.14 नोव्हेंबर 2025 शुक्रवार रोजी पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पुजन करून अभिवादन करण्यात आले व बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला.पंडीत जवाहरलाल नेहरू यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 रोजी अलाहाबाद येथे झाला.त्यांचे पंडीत जवाहरलाल मोतीलाल नेहरू असे नाव होते.ते भारतातील वसाहत विरोधी राष्ट्रवादी,धर्म निरपेक्ष मानवतावादी, सामाजिक लोकशाही वादी आणि लेखक होते. ते भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील प्रमुख नेते होते.

भारत देश 1947 रोजी स्वतंत्र झाल्यानंतर भारताचे ते पहिले पंतप्रधान होते.त्यांनी भारताचे जवळपास 16 वर्षं पंतप्रधान म्हणून काम केले.त्यांनी लोकशाही, धर्मनिरपेक्षता, विज्ञान, तंत्रज्ञानाचा प्रचार केला. त्यांनी भारताला शीत युद्धाच्या दोन गटांपासुन मुक्त केले.त्यांच्या हयाती पासुन पंडीत हे त्यांच्या नावापुढे भारतात लावले जात होते.पंडीत नेहरूंना लहान मुले खुप आवडत होती. लहान मुले त्यांना चाचा नेहरू म्हणत असायचे.

पंडीत नेहरू यांच्या जयंती दिवशी बालदिन साजरा केला जातो.असे आपल्या प्रास्ताविकात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कुंबेफळ शाळेचे अपग्रेड मुख्याध्यापक श्री. राजाभाऊ दत्तात्रय कदम यांनी सांगितले.या शाळेचे प्राथमिक पदवीधरशिक्षक डॉ.श्री.मुळे रामकिशनसर यांनी सविस्तर माहिती दिली.शिक्षक श्री.आकश लोंढे सर,राहुल बचुटे सर, आबासाहेब धपाटे सर, श्री संदीप ठोंबरे सर, शिक्षिका श्रीमती भोरे निलावती मॅडम, श्रीमती उटीकर अंजली मॅडम, ट्रेनी शिक्षिका रोहिणी काळे मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री.राहुल बजरंग बचुटे सर यांनी केले व आभार श्री.आकाश दत्तु लोंढे सर यांनी मानले.या कार्यक्रमास शाळेतील शिक्षक,शिक्षिका,ट्रेनी शिक्षिका,शापोआ कामगार,विद्यार्थी, विद्यार्थिनी,शिक्षण प्रेमी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!