
केज/प्रतिनिधी
शारदा इंग्लिश स्कूल केज शाळेने विविध क्षेत्रात वारंवार आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. शैक्षणिक क्षेत्रात तर शाळेने राज्यभरातआपला नावलौकिक व वेगळा ठसा उमटवला आहे. शाळेत होणाऱ्या विविध उपक्रमामुळे शाळेतील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला आहे.शैक्षणिक क्षेत्रा बरोबरच क्रीडा क्षेत्रातही शाळेच्या अनेक विद्यार्थ्यांनी राज्यस्तर, विभाग स्तर व जिल्हा स्तर या ठिकाणी आपली चमक दाखवलेली आहे.
चालू वर्षी शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र शासन क्रीडा विभागातर्फे आयोजित विविध स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला होता.यामध्ये शाळेच्या अनेक विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात यश संपादन केले आहे.राज्यस्तरावर निवड झालेल्या विद्यार्थ्यां मध्ये आयुषी विजय हिरवे सायकल रोड रेस दहा किलोमीटर,राजवर्धन किरण ओव्हाळ 14 वर्षे वयोगट दहा किलोमीटर, ट्रायल सायकल रेस, सिद्धार्थ चौधरी स्क्वॅश खेळ प्रकारात पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे तर विभाग स्तरावर वैष्णवी बडे,संयुजा थोरात,रोहित चौधरी यांची चेस स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. तसेच स्केटिंग मध्ये समर्थ मुळे याची विभाग स्तरा वर निवड झाली आहे.
कराटे स्पर्धेतही शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपला दमखम दाखवला असून अश्विनी ढिकले,चाळक चैतन्य यांचीही विभाग स्तरावर निवड झालेली आहे तर क्रिकेट संघाच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरा वर आपली निवड करून आपली गुणवत्ता सिद्ध करून दाखवलेली आहे.
शाळेतील विद्यार्थ्यांनी व शाळेतील क्रीडा शिक्षक यांनी घेतलेल्या प्रचंड मेहनतीमुळे हे संपादन केले आहे.शाळेच्या प्रचंड उत्साही असलेल्या क्रीडा शिक्षिका श्रीमती वर्षा दिक्खत,श्री.सोळंके बालाजी सर,श्री.ठोंबरे अनिल सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.शाळेच्या विद्यार्थ्यांनी केलेली प्रचंड मेहनत व मिळवलेले यश यांचा सन्मान शाळेच्या व संस्थेच्या वतीने शाळेमध्ये करण्यात आला.याच बरोबर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे क्रीडाशिक्षक यांचाही सन्मान करण्यात आला.
सदरील कार्यक्रमासाठी शाळेच्या मार्गदर्शिका तथा संचालिका सौ.अर्चनाताई आडसकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.याप्रसंगी बोलताना त्यांनी सांगितले शारदा इंग्लिश स्कूल केज शाळे तील विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळवण्या साठी लागणाऱ्या सर्व सुविधेची कसल्याही प्रकारची कमतरता पडू देणार नाही हे सांगताना त्यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले.या प्रसंगी शाळेचे प्राचार्य डॉ.मिश्रा एस.एम,उप प्राचार्य सुरज सनी,श्री. देशमुख पी.एम व इतर सर्व कर्मचारी उपस्थित होते.



