स्वामी विवेकानंद विद्या मंदिर (प्रा) केज मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा बालवैज्ञानिकांच्या विविध प्रयोगाचे सादरीकरण.


केज / प्रतिनिधी
भारताचे नोबेल विजेते प्रसिद्ध वैज्ञानिक डॉ.सी. व्ही. रमण यांच्या सन्मानार्थ राष्ट्रीय विज्ञान दिन केज शहरातील नामांकित स्वामी विवेकानंद विद्या मंदिर केज येथे साजरा करण्यात आला. प्रसंगी प्रमुख उदघाटक म्हणून प्रा. डॉ. हनुमंत सौदागर , प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. तिडके उपस्थित होते. विज्ञान प्रयोग आणि सत्यावर चालणारे शास्त्र आहे आणि विज्ञान युगात सर्वांनी वैज्ञानिक दृष्टी बाळगावी असे मत उदघाटन प्रसंगी डॉ सौदागर यांनी केले.
विज्ञान प्रदर्शनात शाळेतील विद्यार्थ्यांनी आपापले प्रयोग सादर केले तसेच सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशन स्पर्धा परीक्षे अंतर्गत विजेत्या विद्यार्थ्यांना सन्मानपत्र, मेडल्स देऊन गौरविण्यात आले. विज्ञान विषय शिक्षक एम. गिरी सर यांच्या नियोजनात शालेय पातळीवरील विज्ञान प्रदर्शन यशस्वी झाले प्रयोग सादरीकरणातून भविष्यात उत्कृष्ट वैज्ञानिक बनतील अशी अध्यक्षीय भाषणात कार्यक्रमाचे अध्यक्ष शितोळे यांनी अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. मंगरूळकर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. चोले यांनी केले. आजच्या राष्ट्रीय विज्ञान दिनाचे शाळेत यशस्वी नियोजन व संयोजन करण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन श्री. गिरी व श्री. पूजदेकर यांनी केले.
तसेच संस्थेचे अध्यक्ष, अंकुश अण्णा इंगळे साहेब व सचिव सन्माननीय गदळे सर यांनी विद्यार्थ्यांच्या प्रयोगांची पाहणी करून शुभेच्छा दिल्या. विज्ञान दिवस शाळेत यशस्वी करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.



