
केज/प्रतिनिधी
दि.11 नोव्हेंबर 2025 मंगळवार रोजी मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पुजन करून अभिवादन केले व जयंती साजरी करण्यात आली. मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जन्म दि. 11 नोव्हेंबर 1888 रोजी मक्का येथे झाला.
भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक प्रमुख नेते आणि पहिले शिक्षणमंत्री होते.अबुल कलाम गुलाम मुहियुद्दीन अहमद असे त्यांचे मुळ नाव होते.हा दिवस राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा केलाजातो. अबुल कलाम म्हणजे वाचस्पती ही त्यांची पदवी होती.”आझाद” हे टोपण नावही त्यांना उपाधी मिळाली.असे आपल्या प्रास्ताविकात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कुंबेफळ केंद्र केज मुलांची ता.केज शाळेचे अपग्रेड मुख्याध्यापक श्री राजाभाऊ दत्तात्रय कदम यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.आबासाहेब तुळशिराम धपाटे यांनी केले.या शाळेतील प्राथमिक पदवीधर शिक्षक डॉ.रामकिशन मुळे सर यांनी सविस्तर माहिती दिली.शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्तकेले.यावेळी डॉ.मुळे रामकिशन,श्री संदीप ठोंबरे,श्री राहुल बचुटे, श्री.आबासाहेब धपाटे,श्रीमती भोरे निलावती आनंदराव मॅडम,श्रीमती उटीकर अंजली गोविंद मॅडम, ट्रेनी शिक्षिका रोहिणी काळे, शापोआ कामगार सुवर्णमाला नानासाहेब पवार,विद्यार्थी,विद्यार्थिंनी उपस्थित होते.शेवटी राहुल बजरंग बचुटे सर यांनी आभार मानले.



