
केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील धनेगाव कॅम्प येथील जिजाऊ ज्ञान मंदिर प्री. प्रायमरी इंग्लिश स्कूल मध्ये बालदिन उत्साहात, आनंददायी वातावरणात साजरा करण्यात आला. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती निमित्त दरवर्षी १४ नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा केला जातो.त्यानिमित्त विद्यार्थ्यांनी केक कापून बालदिन साजरा केला.
कार्यक्रमासाठी सांगली जिल्ह्यात सहाय्यक अभियंता म्हणून कार्यरत असलेले इंजि.अभिजीत मुजमुले हे प्रमुख पाहुणे म्हणून होते.त्यांनी बालक हे आपल्या राष्ट्राचे भविष्य आहेत.त्यांची स्वप्ने जपणे,त्यांना संस्कारी वातावरण देणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे तर शिक्षकांनी,पालकांनी बालकांच्या स्वप्नांना पंख द्या ते राष्ट्राचे भविष्य असल्याचे बोलताना सांगितले.यावेळी संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय मुजमुले, शिक्षिका निवेदिता मुजमुले,प्रतीक्षा गुजर उपस्थित हे होते. कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना स्वादिष्ट खाद्यपदार्थ, चॉकलेट व भेटवस्तू वाटप करण्यात आले.दिवसभर शाळेत आनंदी,उत्साही आणि रंगतदार वातावरण पाहायला मिळाले.



