स्वामी विवेकानंद शाळेत राजमाता जिजाऊ,स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी,याप्रसंगी वक्तृत्व व चित्रकला स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार संपन्न

केज/प्रतिनिधी
जीवन विकास शिक्षण मंडळ केज संचलित, स्वामी विवेकानंद विद्या मंदिर [माध्यमिक विभाग] याशाळेमध्ये दि.१२ जानेवारी २०२६ रोजी राजमाता जिजाऊ तसेच स्वामी विवेकानंद यांची जयंती अत्यंतहर्षोत्साहात साजरी करण्यात आली. तसेच या कार्यक्रमाचे औचित्य साधून वक्तृत्व व चित्रकला स्पर्धेमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचाही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते याप्रसंगी सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी जीवन विकास शिक्षण मंडळाचे सचिव जी.बी. गदळे,स्वयंअर्थसहायित शाळेचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नारायण अण्णा अंधारे,शाळेच्या मुख्याध्यापिका शिवनंदा मुळे आदींची उपस्थिती होती.याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या विषयी आपले विचार व्यक्त केले.
युवा स्पंदन सामाजिक संस्था तुळजापूर येथील मराठवाडा सामाजिक संस्था तुळजापूर यांच्या वतीने श्री.तुळजाभवानी शाकंभरी नवरात्रोत्सवा निमित्त आयोजित राज्य स्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये या शाळेतील स्वरा विठ्ठल बोराडे हिला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. तसेच ड्रॉइंग ग्रेड परीक्षे मध्ये आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन केले. एलिमेंट्री ड्रॉईंग ग्रेड परीक्षेसाठी एकूण २१ विद्यार्थी बसले होते. त्यामध्ये अ श्रेणी २,ब श्रेणी ४ तर क श्रेणीमध्ये १५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये अमृता कांबळे, रणवीर तपसे अ श्रेणी घेऊन उत्तीर्ण झाले.तर समिधा एखंडे,श्रेया धेंडे, श्रेया मेंद्रे,सिद्धी जाधव यांनी ब श्रेणी मिळवली. इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेसाठी एकूण २८ विद्यार्थी बसले होते.
त्यामध्ये ब श्रेणी १५ तर क श्रेणीमध्ये १३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.यामध्ये अनुष्का काकडे,भक्ती लांब,गायत्री पारखे, कृष्णा इंगळे,मानवी पालवे,ओम आठरे,राफिया इनामदार, साक्षी बेडसकर,समीक्षा घुले,समीक्षा देशमुख, संस्कृती शिंदे,श्रेया घाटुळे, श्रेया गुंड,स्वरालीबारगजे, वैभवी काळे यांनी ब श्रेणी मिळविली.वरील यशस्वी विद्यार्थ्यांना वक्तृत्व स्पर्धेसाठी शाळेतील सहशिक्षक दत्ता सत्वधर तर ड्रॉइंग परीक्षेसाठी चित्रकला शिक्षक दादासाहेब गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. याबद्दल त्यांचाही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्र संचलन व आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रबोधकांत समुद्र यांनी केले.



