युसूफ वडगाव जिल्हा परिषद गट जिंकण्यासाठी राहुल भैय्या सोनवणे यांचे मिशन! बीड जिल्ह्याच्या राजकारणात ‘राहुलभैय्या’ पर्व — काँग्रेस जिल्हाध्यक्षांची दमदार तयारी

केज/प्रतिनिधी (चंद्रकांत पाटील )
बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल भैय्या सोनवणे यांनी आगामी युसूफ वडगाव जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीवर आपले पूर्ण लक्ष केंद्रित केले आहे. “लढणार आणि जिंकणार!” या निर्धाराने त्यांनी निवडणुकीची रणनीती आखत गावा गावात जनसंपर्क मोहीम सुरू केली आहे.
युसूफ वडगाव सर्कल मधील प्रत्येक गावाशी त्यांचा घट्ट संपर्क असून, शेतकरी,कामगार,महिला आणि युवक वर्गात त्यांचा प्रभाव लक्षणीय आहे.गंगा माऊली शुगर कारखाना, विविध शैक्षणिक संस्था आणि शेतकरी क्रांती आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागात आपली ठसठशीत ओळख निर्माण केली आहे.
शेतकरी हितासाठी अखंड लढा:
राहुल भैय्या सोनवणे यांनी शेतकरी क्रांती आंदोलन आणि गंगा माऊली साखर कारखान्याच्या माध्यमा तून शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत.त्यांच्या कार्यामुळे शेतकऱ्यांचा त्यांच्यावर विश्वास वाढला आहे.
शैक्षणिक क्षेत्रातील योगदान:
त्यांच्या शिक्षण संस्थांमुळे अनेक गरीब आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळाली आहे. शिक्षणाच्या माध्यमातून समाज उन्नती करण्याचे त्यांचे कार्य उल्लेखनीय ठरले आहे.
सारणी-आनंदगाव मॉडेल:
सारणी आणि आनंदगाव ग्रामपंचायतींमध्ये शाश्वत विकासाचे मॉडेल उभे करून त्यांनी ग्रामीण प्रशासनात पारदर्शक आणि प्रगत दृष्टिकोन दाखविला आहे.सारणी ग्रामपंचायतचा कारभार समर्थपणे राहुल भैय्या सोनवणे यांच्या नेतृत्वात वाटचाल करीत आहे.
सर्वसमावेशक नेतृत्व:
राहुल भैय्या हे सर्व जाती धर्मातील नागरिकांना सोबत घेऊन जाणारे सर्वसमावेशक नेते म्हणून ओळखले जातात.त्यांच्या नेतृत्वामुळे काँग्रेस पक्षाचे संघटन ग्रामीण भागात अधिक मजबूत झाले आहे.
मराठा आरक्षणासाठी आंदोलन:
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी त्यांनी केवळ भाषणांपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले.या संघर्षमय भूमिके मुळे समाजात त्यांच्या नेतृत्वावरचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.
युसूफ वडगाव जिल्हा परिषद गट काँग्रेसच्या ताब्यात आणून जिल्ह्यात पक्षाला अधिक बळकट करण्याचे मोठे मिशन राहुल भैय्या सोनवणे यांनी हाती घेतले आहे. त्यांच्या या आक्रमक तयारीमुळे युसूफ वडगाव गटाची निवडणूक लढत अधिक रोचक होणार आहे,यात शंका नाही.



