ॲड.बापुजी जाधव यांचे शिवसेना (शिंदे गट) शेतकरी आघाडी बीड जिल्हाप्रमुखपदी निवड मान्यवरांच्या उपस्थितीत स्वागत.

बीड/प्रतिनिधी
शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे गटाच्या शेतकरी आघाडीच्या बीड जिल्हाप्रमुखपदी ॲड. बापुजी जाधव यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करून हार्दिक स्वागत करण्यात आले. यावेळी भारतीय जनता मजूर संघाचे राष्ट्रीय सचिव तथा नमो संघाचे प्रदेशाध्यक्ष भाऊसाहेब घोडके,ऊसतोड कामगार कृती समितीचे निमंत्रक तसेच लेक लाडकी अभियानाचे प्रणेते बाजीराव ढाकणे आणि दैनिक आत्ताच एक्स्प्रेसचे बीड जिल्हा प्रतिनिधी किशोर देवा कुलकर्णी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
शेतकरी हक्क,प्रश्न आणि त्यांच्या न्यायासाठी आवाज बुलंद करण्याचे काम पुढे अधिक जोमाने सुरू राहील,असा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला.तसेच जिल्ह्यातील शेतकरी संघटनात्मक दृष्ट्या अधिक सक्षम व्हाव्यात यासाठी नियोजनबद्धरीत्या काम करण्याचा निर्धार ॲड. जाधव यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमात मान्यवरांनी जाधव यांना शुभेच्छा देत आगामी भूमिका प्रभावीपणे पार पाडण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. तसेच पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या आहेत.



