क्रिडाशैक्षणिक

जीवन शिक्षण प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय केजच्या खेळाडूंचे विभागीय मैदानी स्पर्धेत घवघवीत यश.

केज/ प्रतिनिधी

दिनांक 08 नोव्हेंबर 2025 रोजी मानवत जिल्हा परभणी या ठिकाणी विभागीय मैदानी स्पर्धा पार पडल्या.ज्यात 14 वर्ष मुलींमध्ये 1)कु.धनश्री अर्जुन सोनवणे –थाळीफेक प्रथम ,17वर्ष मुलींमध्ये 2) कु.घुले पूनम रामेश्वर (थाळीफेक तृतीय) 19 वर्ष मुलींमध्ये, 3) कु.गौरी सचिन उगलमुगले –थाळीफेक द्वितीय,4) चि.अथर्व शिवराज घुले–14वर्ष गोळाफेक (तृतीय), 5) चि. रोनक रणधीर ठोके–14 वर्ष 200 मी.(तृतीय) या उल्लेखनीय यशामागे क्रीडा मार्गदर्शक श्री.साजेद पठाण सर, भीमाशंकर तोंडसे सर, अश्विनी दळवे मॅडम व किशोर मस्के सर यांचे कष्ट व मार्गदर्शन मोलाचे ठरले.

आगामी राज्य स्तरीय स्पर्धेसाठी संस्थेचे सचिव डॉ.हारूनभाई इनामदार,सहसचिव यासीनभाई इनामदार, मुख्याध्यापक श्री. रमाकांत ढाकणे सर,उप मुख्याध्यापक श्री.संदीप गुळवे सर,बन्सल क्लासेसचे सहसंचालक गोविंद ठोंबरे सर तसेच मुख्याध्यापक बाळासाहेब ठोंबरे सर यांनी सर्व खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.जीवन शिक्षण परिवाराच्या पराक्रमी मुलींना सर्व स्तरातून मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात येत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!