गुन्हेगारी

अल्पवयीन तरुणावर केज पोलिस ठाण्यात  विनयभंगाचा गुन्हा नोंद 

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील एका खेडेगावातील १७ वर्षीय महाविद्यालयीन तरुणी पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी मैदानावर गेली असता पाठीमागून तिच्या गावातीलच तिच्या महाविद्यालयातील १७ वर्षीय तरुण तेथे दुचाकी वरून आला व तरुणीच्या हाताला धरून,आय लाईक यु,तु माझ्या सोबत लग्न कर,असे म्हणुन त्याने तिचा विनयभंग केल्या प्रकरणी  अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून अल्पवयीन तरुणा विरुद्ध केजपोलिस ठाण्यात बालकांचे हक्काचे संरक्षण व विनयभंगाचा गून्हा नोंद झाला आहे.

सोमवारी दि. 3 नोव्हेंबर रोजी सकाळी मुलीच्या वडिलांनी तीला पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी शेजारच्या गावच्या मैदानावर आणुन सोडले. त्या ठिकाणी ही मूलगी आपल्या मैत्रिणी सोबत पोलीस भरतीचे प्रशिक्षण घेत असताना तेथे तिच्या गावातील व तिच्याच महाविद्यालयात शिक्षण घेणारा १७वर्षाचा तरुण दुचाकीवरून तेथे आला.तु मला दहावीच्या वर्गात असल्यापासून आवडतेस,असे म्हणुन त्याने त्या मुलीच्या हाताला धरून ओढले व तु माझ्या सोबत लग्न कर, आय लाईक यु असे बोलला.

त्यानंतर त्या मुलीने तु मला आवडत नाहीस असे संगितले असता तु जर मला नकार दिलास तर मी तुझ्याबद्दल गावातील मुलांना तुझ्या बद्दल अपप्रचार करून, तुझे करीअर खराब करीन अशी धमकी देऊन तो तेथुन निघुन गेला.या अगोदर ही त्याने अनेक वेळा या मुलीचा पाठलाग केला होता.

घडलेला प्रकार मुलीने तिच्या आई, वडिलांना सांगितल्या नंतर पिडीत मुलीच्या फिर्यादीवरून अल्पवयीन असलेल्या १७ वर्षीय तरुणाविरुद्ध केज पोलिसात बालकाच्या हक्काचे संरक्षण व विनयभंगाचा गून्हा नोंद झाला आहे.पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंक पथकाचे प्रमुख पोलीस उप निरीक्षक प्रकाश शेळके हे पुढील तपास करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!