अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघ महाराष्ट्र राज्य युवक प्रदेशाध्यक्ष पदी रोहन गलांडे पाटील यांची निवड

बीड/प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील चिंचोली माळी येथील रोहन गलांडे पाटील यांची अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघ महाराष्ट्र राज्य युवक प्रदेशाध्यक्षपदी, सचिव चंद्रकांत दादा जाधव व कार्याध्यक्ष सतिष पवार पाटील यांच्या शिफारशी नुसार अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघ संस्थापक अध्यक्ष शिवश्री प्रल्हाद दादा गुळभिले पाटील यांच्या आदेशानुसार नियुक्ती पत्र देऊन करण्यात आली आहे तरी रोहन गलांडे पाटील यांनी कुणबी मराठा महासंघा च्या संस्थापक अध्यक्ष शिवश्री प्रल्हाद दादा गुळभिले यांचे व सर्व वरीष्ठ पदाधिकारी यांचे आभार मानले आहेत, आयुष्यभर ऋणी राहीन असे मत व्यक्त केले आहे.
तसेच रोहन गलांडे पाटील यांनी म्हटले की संघाने माझी नियुक्ती आजपर्यंत केलेल्या कामाची दखल घेऊन केलेली आहे जसे की मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण तसेच सर्वसामान्य जनतेसाठी अनेक छोटे मोठे आंदोलने विकास कामे केले आहेत त्यांची दखल घेऊन मला अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघ महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
त्यामुळे मी यापुढेही असेच सर्वसामान्य जनते साठी सर्व जातिधर्मातील नागरिकांसाठी कायम लढत राहील शेवटच्या श्वासापर्यंत व महाराष्ट्रात अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघाचे संघटीकरण मोठ्या संख्येने करणार आहे असे वचन संस्थापक अध्यक्ष यांना दिले आहे असे रोहन गलांडे पाटील यांनी म्हटले आहे.



