केज रोटरी क्लबच्या इमर्जेन्सी रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद

केज/प्रतिनिधी
केज रोटरीने आयोजित केलेल्या तातडीच्या रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळाला.केज शहरातील अकरा रक्त दात्यांनी आवाहन करताच तातडीच्या रक्तदान शिबिरात रक्तदान करून आपले सामाजिक दायित्व पार पाडले.सध्या संपूर्ण बीड जिल्ह्यात रक्त पेढ्यांना रक्ताचा तुटवडा भासतोय.दरवर्षी बीड जिल्ह्यात व राज्यात केवळ महापुरुषांच्या जयंत्या, नेत्यांचे वाढदिवस यासारख्या दिनविशेषच्या निमित्तानेच बहुतांश रक्तदाते रक्तदान करतात.
मात्र वर्षातील कांहीं काळ दिन विशेष नसल्याने लोक रक्तदान करत नाहीत त्यामुळे या सायलेंट पिरियड मध्ये सर्वच रक्तपेढ्यामध्ये रुग्णांना रक्ताचा तुटवडा भासतो.या काळात रक्तदान करणे गरजेचे आहे.केज रोटरीच्या वतीने अशा काळातच इमर्जेन्सी रक्तदान शिबिरे घेण्याचे ठरवले आहे.
म्हणूनच केज रोटरीचे अध्यक्ष सत्यवान राऊत, सचिव प्रवीण देशपांडे, प्रोजेक्ट चेअरमन जितेंद्र देवधारे, अनिकेत पाटील व संस्थापक अध्यक्ष हनुमंत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी केजच्या हनुमान मंदिर वकीलवाडी येथे तातडीचे रक्तदान शिबिर आयोजित केले होते.यामध्ये
1-शेख अर्षद बाबू , 2-अनिल जयवंत सत्वधर
3-अंबाड सुरेश जयराम , 4-महेश रामेश्वर जाजू
5-देशमूख बालाजी काशिनाथ(विजय देशमुख सर)
6-अंकुर अभिमन्यूचाळक , 7-प्रतीक हनुमंत भोसले
8-अरविंद त्र्यंबक बोबडे , 9-समर्थ जोगदंड
10- किशोर इतापे , 11-गणेश बजगुडे
या सामाजिक नायकांनी रक्तदान केले.यामुळे एकूण 36 रुग्णांना रक्तपुरवठा करणे शक्य होणार आहे. वरील सर्व रक्तदात्यांचे केज रोटरी क्लबने कौतुक करून आभार व्यक्त केले. हे शिबिर यशस्वी करण्या साठी अध्यक्ष सत्यवान राऊत,सचिव प्रवीण देशपांडे, प्रोजेक्ट चेअरमन जितेंद्र देवधारे,संस्थापक अध्यक्ष हनुमंत भोसले, रो.दादा जमाले पाटील,रो. महेश जाजू यांनी विशेष परिश्रम घेतले.



