अध्यात्मिक
आजपासून अंबाजोगाई येथे किर्तन महोत्सव

अंबाजोगाई/प्रतिनिधी
शुक्रवार दि.१२ सप्टेंबर ते रविवार दि.१४ सप्टेंबर या कालावधीत दत्त संस्थान धाकटे देवघरच्या वतीने संत सर्वज्ञ दासोपंत यांच्या जन्मोत्सवा निमित्त तीन दिवसीय नारदीय कीर्तन महोत्सव होणार आहे.
यात शुक्रवार दि.१२ सप्टेंबर रोजी परभणी येथील प्रख्यात महिला किर्तनकार ह.भ.प. स्मिता आजेगावकर,शनिवार दि.१३ सप्टेंबर रोजी ह.भ.प.डॉ.सविता मुळे (छत्रपती संभाजी नगर),तर दि.१४सप्टेंबर रविवार रोजी पुणेयेथील ह.भ.प.हरिहरबुवा नातू यांचे नारदीय किर्तन संध्याकाळी ७-०० वाजता देशपांडे गल्ली भागातील दत्त संस्थान धाकटे देवघर येथे होणार असूनभाविकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.



