प्रशासकीय

मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थींचे मानधन द्या -युवा प्रशिक्षणार्थींची मागणी

केज/प्रतिनिधी

महाराष्ट्रातील महायुती सरकारने राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी निवडणुकीच्या तोंडावर सहा महिन्यांसाठी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी म्हणून योजना काढली.त्यात अनेक तरुणांना अल्प रोजगार मिळाला.मात्र हा रोजगार देण्यात प्रशासनाच्या वतीने दिरंगाई होत असून गेल्या दोन महिन्यासह ऑगस्ट महिन्याचे मानधन थकले असून ते तात्काळ देण्याची मागणी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी यांनी केली आहे.सरकारने राज्यातील अंदाजे 1 लाख ३४ हजार मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थीना रोजगार उपलब्ध करून दिला. बेरोजगार तरुणांच्या हाताला काम दिले आहे.मागील सहा महिन्याचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर पुढे पाच महिने वाढीव देण्यात आले आहे.

राज्यातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व त्या खात्याचे मंत्री हे युवा प्रशिक्षणार्थीच्या भावनेची कदर करून युवा प्रशिक्षणार्थीना हक्काची कायमस्वरूपी भाकरी मिळवूनदेण्याची मागणी ही मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी यांच्या कडून वारंवार करण्यात येत आहे.तरी प्रशासनाने युवा प्रशिक्षणार्थीचे थकित मानधन वाटप करून दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!