साबला येथे ऊसतोड कामगारांचे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील मौजे साबला आरोग्य विभाग, जिल्हा परिषद ,बीड व ग्रामपंचायत कार्यालय, साबला यांच्या वतीने या मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन साबला येथील सरपंच सौ.जनाबाई नरहरी काकडे यांच्या वतीने करण्यात आले होते.
साबला येथील नागरिक जास्त प्रमाणात ऊस तोडणी करण्यासाठी ऊसतोड कामगार म्हणुन काम करण्यासाठी ईतर बाहेरच्या राज्यात दुर दुर ठिकाणी जातात.म्हणुन त्यांच्या आरोग्याची तसेच गावातील ईतर नागरिकांच्या आरोग्याची काळजी म्हणुन मोफत ऊसतोड कामगार आरोग्य शिबिर घेण्यात आले होते तसेच इतर सर्व गावातील नागरिकांची आरोग्य तपासणी करून त्यांना तात्काळ औषध,उपचार करण्यात आला.त्यामध्ये बिपी ,शुगर ,कॅन्सर ,HIV, हिमोग्लोबिन तसेच सर्व आजारांची तपासणी करण्यात आली.यावेळी साबलायेथील नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला.
आरोग्य मोफत तपासणी शिबिरातील डॉ.उदय धाट समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.निखील कवडे समुदाय आरोग्य अधिकारी,डॉ.तौफिक पटेल,समुदाय आरोग्य अधिकारी श्री.संतोष काटे आरोग्य सहाय्यक,श्री. नितिन गलांडे पाटील, आरोग्यसेवक रामचंद्र आंधळे, आरोग्य सेवक सौ.शिवप्रभा कोरसाळे, आरोग्यसेविका सौ. चंपावती सत्वधर,परिचर शेख सलीम,महाराष्ट्रराज्य एड्स नियंत्रण कक्ष ग्रामीण विकास यंत्रणा वरील सर्व वैद्यकिय अधिकारी,कर्मचारीयांच्या उपस्थितीत साबला येथे ऊसतोड कामगार तसेच इतर सर्व नागरिकांची तपासणी करून त्यांना तात्काळ औषध उपचार करण्यात आला.
साबला येथील ऊसतोड कामगार मोफत आरोग्य तपासणी शिबिर यशस्वी करण्याचे समाजसेवक आदर्श शिक्षक नरहरी काकडे तसेच ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर पांचाळ,गुलाब मुळे, विश्वनाथ नाईकनवरे गणेश कटारे,लक्ष्मण कटारे,लखन राऊत, रामराजे शिंदे ,राहुल मुळे, सौरभ काकडे इत्यादींनी केले.यावेळी ऊसतोड कामगार यांना ऊसतोड कामगार या प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.



