युसूफवडगाव पंचायत समिती गणातून युवा नेते प्रितम चंद्रकांत खरात यांच्या उमेदवारीची मागणी

केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील सारणी आनंदगाव येथील रहिवासी तथा गेल्या पस्तीस वर्षांपासून दलित चळवळीतून कार्यरत असलेले ज्येष्ठ समाज सेवक चंद्रकांत खरात सर हे मागासवर्गीय समाजा तील व्यक्तीवर होणाऱ्या अन्याय-अत्याचारा विरोधात आवाज उठवणारे आणि सामाजिक बांधिलकी जपणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसतानाही त्यांनी समाजात नाव लौकिक मिळवला आहे.
याच कार्याची परंपरा घेत त्यांचे चिरंजीव श्री.प्रितम भेय्या खरात यांनी पुढे चालविली आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत,प्रितम भैय्या खरात हे सर्व जाती-धर्मा तील लोकांच्याअडचणींना हातभार लावणारे आणि सामाजिक विकासासाठी सदैव तत्पर राहिले आहेत.सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे केज तालुका उपाध्यक्ष म्हणून काम पाहत असून जनते मध्ये मेहनती व जनसंपर्क शील नेतृत्व म्हणून ओळखले जातात. आगामी युसुफवडगाव पंचायत समिती गण हा अनुसूचित साठी सर्व साधारण असे आरक्षण राखीव असून निवडणुकीच्या काळात अनेक इच्छुक उमेदवार रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.
मात्र,प्रत्यक्ष रस्त्यावर काम करणारे आणि समाजातील प्रत्येक घटकाच्या प्रश्नांशी निगडित राहणारे नेतृत्व म्हणून प्रितम खरात यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.स्थानिक नागरिक, समाजातील विविध संघटना तसेच कार्यकर्त्यां कडून “सामाजिक विकासासाठी कार्यक्षम व प्रामाणिक नेतृत्वाला संधी द्यावी” अशी मागणी होत असून,महायुतीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून प्रितम खरात यांना उमेदवारी देण्याची मागणी जनतेतून होत आहे.
युसुफवडगाव गणातील मतदारांच्या अपेक्षेप्रमाणे,लोक हिताचा विचार करणारे आणि सर्वसमावेशक दृष्टीकोन बाळगणारे प्रितम खरात हे आगामी निवडणुकीत जनतेचा विश्वास संपादन करतील, असा विश्वास स्थानिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.



