सामाजिक

आझाद क्रांती सेनेच्या माध्यमातून गौरवाडी येथील वहीवाट रस्ता मोकळा करण्यासंदर्भात रामा लक्ष्मण दुनघव यांचे केज तहसीलदारांना निवेदन,निवेदनाची दखल न घेतल्यास दि.२८ ऑक्टोबर २०२५ रोजी तहसील कार्यालयासमोर पाळीव प्राण्यांसह आमरण उपोषण करणार असल्याचा प्रशासनाला इशारा

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील गौरवाडी येथील शेतकरी रामा लक्ष्मण दुनघव हे शेती बरोबरच ऊसतोड कामगार आहेत.त्यांचे वडील लक्ष्मण वडजू दुनघव यांनी गौरवाडी तील सर्वे नंबर ११२/२ मधील काही जमीन विकत घेतली होती. कालांतराने दुनघव कुटुंबीय तिथे राहण्या साठी गेले.हळूहळू त्या भागात २०० लोकांची वस्ती तयार झाली.वीज, पाणी,रस्ता व पायवाट यांची सोय तयार करण्यात आली.हे सर्व वडिलोपार्जित असल्याचे ते सांगतात. परंतु मध्यंतरी राजकीय द्वेषापोटी काही लोकांनी त्यांचा रस्ता अडवला.दुनघव कुटुंबीयांनी घेतलेली पाईप लाईन जे.सी.बी. च्या माध्यमातून खोदण्यात येऊन दळणवळणासाठी अटकाव करण्यात आला.

त्याचप्रमाणे मूळरस्त्याच्या जागी नाली मोठी करून, त्याठिकाणी झाडे लावल्याचे निवेदनात नमूद केले आहे.विलास दादाराव घाडगे,कल्यान दादाराव घाडगे,दिपक विलास घाडगे,भाउसाहेब बाजीराव घाडगे, कालीदास भाऊसाहेब घाटगे, भारत बाजीराव घाडगे,रावसाहेबबाजीराव घाडगे, केशव कल्याण घाटगे,आप्पा विलास घाटगे, राधाबाई कल्याण घाडगे, उषाबाई विलास घाडगे, अर्चना दिपक घाडगे, पारुबाई भारत घाडगे,अरुणा रावसाहेब घाडगे, भिवराबाई भाउसाहेब घाडगे या सर्व लोकांनी दुनघव कुटुंबीयांची रस्ता अडवून अवहेलना केली.

तसेच पाण्याची पाईप लाईन खोदुन, विकासात्मक इत्तरही जीवनावश्यक सुविधेपासून व योजने पासून येथील दलित वस्तीला वंचित केले असल्याचे रामा लक्ष्मण दुनघव यांनी निवेदनात म्हटले आहे.तरी प्रशासनाने दखल घेऊन, चौकशी लावून,सदरील रस्ता वहिवाटीसाठी ७ दिवसाच्या आत खुला करून द्यावा,अन्यथा दिनांक २८ ऑक्टोबर २०२५ रोजी दुनघव कुटुंबीय त्यांच्या पाळीव प्राण्यांसह आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

सदरील प्रकरणामध्ये आझाद क्रांती सेनेचे तालुका प्रमुख शरद थोरात हे आक्रमक भूमिकेत असून पूर्वजांपासून दलीतवस्तीत असलेला रस्ता दुनघव कुटुंबियांसाठी वहीवाटी साठी खुला करुन द्यावा, येथील वस्तीवर राहणाऱ्या लोकांना पिण्याचा पाण्याची सोय करुन द्यावी,व वरील दाखवलेल्या लोकांपासून दुनघव कुटुंबीयांना धोका असून दररोज जातीवर शिवीगाळ करण्यात येत असल्यामुळे त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही व्हावी. स्पॉट पंचनामा करून पीडितांना योग्य तो न्याय देण्यात यावा.या मागण्या आझाद क्रांती सेनेचे तालुकाप्रमुख शरद थोरात यांनी लावून धरल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!