
केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील शेलगाव गांजी येथील सरपंच श्रीहरी चंद्रसेन जाधव हे येत्या जिल्हा परिषद निवडणुकीत युसूफवडगाव गणातून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तयारीत आहेत.ते प्रभावी नेते असून त्यांनी तीन वेळा शेलगाव गांजी गावचे सरपंच पद भूषवून ग्रामविकासाची यशस्वी परंपरा निर्माण केली आहे. ग्रामपातळी वरील विविध विकास कामांमुळे आणि लोक संपर्कामुळे श्रीहरी जाधव यांचा परिसरात मजबूत जनाधार असल्याचे सांगण्यात येत आहे.
शेलगाव गांजी,युसूफ वडगाव तसेच आसपास च्या गावांतील नागरिकांनी त्यांच्या उमेदवारीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.गावातील मूलभूत सुविधा ,रस्ते ,पाणी पुरवठा, शिक्षण आणि सामाजिक सलोखा राखण्याच्या त्यांच्या कार्याचा अनुभव यावेळी जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांच्या बाजूने महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.श्रीहरी जाधव यांनी आपल्या निवडणुकीच्या तयारीबाबत सांगितले की,मी नेहमीच जनतेच्या विकासासाठी काम केले आहे.
युसूफवडगाव गणातील सर्वसामान्यांचा आवाज बनून विकासाची वाटचाल पुढे नेण्याचा माझा संकल्प आहे.या निर्णयामुळे युसूफवडगाव गणातील निवडणुकीत आता चुरशीची लढत रंगणार असून,स्थानिक राजकारणात नवचैतन्य निर्माण झाले आहे.



