प्रशासकीय

बीड येथे तीन दिवसीय विशेष वसुली अधिकारी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन -खोडसे सी.ए.प्रमाणित लेखा परीक्षक सहकारी संस्था बीड यांची माहिती       

केज/प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य सहकार संघ मर्यादित पुणे अंतर्गत,सहकार प्रशिक्षण केंद्र लातूर व मा.जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बीड यांचे संयुक्त विद्यमाने बीड येथे जिल्ह्यातील नागरी, ग्रामीण ,कर्मचारी पतसंस्थांना संचालक, कर्मचारी. यांच्याकरिता विशेष वसुली अधिकारी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन गुरुवार दिनांक 25 सप्टेंबर 2025 ते शनिवार दिनांक 27 सप्टेंबर 2025 या कालावधीत तीन दिवसीय प्रशिक्षणा चे आयोजन केले आहे.

सदरील प्रशिक्षण बीड जिल्हा मध्यवर्ती बँक मुख्य कार्यालय राजुरी वेस बीड येथील सभागृहात आयोजित करण्यात आले आहे या तीन दिवसीय प्रशिक्षणा मध्ये आर.एस.बोडके अकोला,एन.एन. कुलकर्णी सोलापूर, आदेश नहार सीए बीड, एस.आर.कोले उप प्राचार्य सहकार प्रशिक्षण केंद्र लातूर, तसेच सी.ए.खोडसे प्रमाणित लेखापरीक्षक सहकारी संस्था बीड हे सदरील विषयावर मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.

तरी या प्रशिक्षणाचा बीड जिल्ह्यातील सर्व नागरी, ग्रामीण,कर्मचारी पतसंस्था येथील संचालक,कर्मचारी यांनी लाभ घ्यावा.पूर्व नोंदणी करून प्रशिक्षणात सहभागी व्हावे असे आवाहन श्री. खोडसे सी.ए. प्रमाणित लेखापरीक्षक सहकारी संस्था बीड यांनी प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!