सम्यक विद्यार्थी आघाडीचे राज्य प्रवक्ते प्रशांत बोराडे यांचा साळेगाव येथे भव्य सत्कार समारंभ संपन्न

केज/प्रतिनिधी
सम्यक विद्यार्थी आघाडीचे राज्य प्रवक्ते प्रशांत बोराडे यांचे साळेगाव येथे आगमन झाले असता गावकऱ्यांच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला.या प्रसंगी लक्ष्मण ओव्हाळ जिल्हा सचिव युवक वंचित बहुजन आघाडी बीड पूर्व,तसेच ओबीसी बांधव,मराठा-मुस्लिम बांधव आणि गावातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गावकऱ्यांनी बोराडे यांना शाल ,श्रीफळ व पुष्पहार देऊन गौरव केला.सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय प्रश्नांवर सम्यक विद्यार्थी आघाडीने उभारलेल्या चळवळी बाबत व प्रशांत बोराडे यांच्या कार्याबाबत या वेळी विशेष कौतुक करण्यात आले.छत्रपती संभाजी नगर वरून सोलापूर कडे जाताना साळेगाव येथे झालेल्या या धावत्या भेटीत भारत बुदगुडे,दत्ता तोंडे, बालाजी पटने, सिद्धेश्वर मुळे,राजाभाऊ पारखे, सोहेलपठाण,राजाभाऊ सरवदे,अशोक बचूटे, बालू मुळे,बिभीषण गित्ते,मोहन पारखे, सय्यद चाँद ,सुधीर पारखे,सर्जेराव लांडगे, गणेश वरपे, विक्रम वरपे, बालाजी मेडकर, ओम मुळे,दीपक मुळे आदी मान्यवर उपस्थित होते.



