केज तालुक्यातील युवा नेते प्रितम खरात यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती

केज/प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या केज तालुका उपाध्यक्षपदी प्रितम चंद्रकांत खरात रा. सारणी आनंदगाव ता.केज यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष अॕड. राजेश्वर चव्हाण यांनी याबाबतचे नियुक्तीपत्र दिले आहे.या नियुक्ती पत्रात त्यांनी म्हटले आहे की,प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिलजी तटकरे आणि आमदार धनंजयजी मुंडे यांच्या सूचनेनुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विचारसरणी प्रमाणे प्रितम खरात यांनी पक्ष संघटन बळकट करण्यासाठी आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर काम करण्या साठी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा जिल्हाध्यक्ष अॕड. राजेश्वर चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.प्रितम खरात यांच्या या निवडी बद्दल तालुक्यात व जिल्ह्यातील कार्यकर्त्यां कडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.



