क्रिडाशैक्षणिक

केज तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत साने गुरुजी निवासी विद्यालयाचे घवघवीत यश

केज/प्रतिनिधी

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे,जिल्हा परिषद बीड,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बीड व क्रीडा अधिकारी कार्यालय केज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुका स्तरीय मैदानी स्पर्धेत साने गुरुजी निवासी विद्यालयाने आपल्या यशाची परंपरा कायम ठेवत यश संपादन केले आहे. या स्पर्धेत 17 वर्ष मुले रिले 100 गुणिले 4 चार प्रथम,जगताप सिद्धेश्वर लांब उडी द्वितीय, बारगजे अभिषेक गोळा फेक 19 वर्षे तृतीय, 200 मीटर धावणे 19 वर्ष मैंद अभिषेक अनिल प्रथम,सतरा वर्ष मुली थाळीफेक अंजली केंद्रे तृतीय,19वर्ष 200 मी धावणे प्रथम,400 मीटर धावणे प्रथम, 100 मीटर धावणे अनिता पांचाळ द्वितीय, तीन किलोमीटर चालणे सर्व द्वितीय निकिता राजगुरू सतरा वर्षे रिले तृतीय,पूजा ठोंबरे लांब उडी तृतीय या सर्व विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवून शाळेच्या क्रीडा यशाची परंपरा कायम ठेवली आहे.

या सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक सानप सर, साखरे सर मार्गदर्शिका कराड मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले आहे. संस्था अध्यक्ष अॕड. उद्धवराव कराड,कापसे सर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!