सामाजिक

केज शहरातील श्रीमंत नानासाहेब देशपांडे प्रतिष्ठान तर्फे पूरग्रस्तांना २५ हजारांची मदत 

केज/प्रतिनिधी

मराठवाड्यासह संपुर्ण महाराष्ट्रात पावसाने घातलेल्या थैमानाने अनेक गावातील लोकांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे अशा संकटाच्या काळात सर्वांच्या अशा अपेक्षा सरकार कडूनच आहेत.आताशासनाच्या मदतीशिवाय या अस्मानी संकटाचा सामना करणे अशक्य आहे.अशा यासंकटाच्या वेळी महाराष्ट्र शासना बरोबर सहभागी होऊन पुरग्रस्त बांधवांना शक्यतो मदत करणे आवश्यक आहे.

परमपूज्य श्रीमंत नानासाहेब महाराज देशपांडे केजकर प्रतिष्ठानच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २५ हजार रुपये आपले उत्तर दायित्व म्हणून केजचे तहसीलदार श्री.राकेश गिड्डे यांच्याकडे २५ हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.या प्रसंगी श्री.सुनीलराव देशपांडे, प्रशांत बापु देशपांडे, समीर देशपांडे,अवधूत देशपांडे,प्रविण देशपांडे,मंदार देशपांडे, राजीव देशपांडे,सुनिल देशपांडे यांचे पुरग्रस्त जनतेसाठी हे कार्य अतुलनीय आहे.यावेळी पत्रकार गौतम बचुटे हे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!