सामाजिक
सह दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये महसुल सप्ताहाचे आयोजन,
सह दुय्यम निबंधक कार्यालया समोर वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न.

केज/प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागाच्या वतीने केज तालुका कार्यालयात दि.१ ते ७ आॕगष्ट कालावधी दरम्यान महसूल सप्ताह आयोजीत करण्यात आला.शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी विशेष माहिती सह दुय्यम निबंधक श्रीमती एस. के.परदेशी व कनिष्ठ लिपिक श्री.समिर शेख यांनी पक्षकारांना मार्गदर्शन केले.सलोखा योजना,जमीन अदला बदल पत्र इत्यादी सुविधा प्रदान करण्यात आल्या.या सप्ताह काळात मुद्रांक विक्रेते श्री.उत्तम थोरात,वचिष्ट घोळवे,श्रीराम शेटे, हारुण कुरेशी,खाजा शेख,अजिज शेख, मोहन चाटे,भगवान जमाले,किसन महाजन अनंत सिरसट,गणेश आरकडे तसेच लेखनीक भिमराव लोंढे,रामभाऊ धनवडे, आश्रुबा रांजणकर, तसेच अॕड व्ही.एम मुंडे, अॕड.बी.जे.गुंडरे, पप्पु वाघमारे,जोशी,हिराचंद काळे,धैर्यशील देशमुख आदी उपस्थित होते.



