सामाजिक
काँग्रेस प्रदेश सरचिटणीस आदित्य पाटील यांनी घेतली काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट

केज/प्रतिनिधी
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. मल्लिकार्जुन खरगे यांची काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस श्री.आदित्य दादा पाटील यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी आदित्य पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन खरगे यांचे स्वागत केले आणि विविध विषयांवर चर्चा केली.या सदिच्छा भेटी दरम्यान महाराष्ट्र राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती, आगामी निवडणुकांचे नियोजन आणि पक्ष संघटनेच्या बळकटी करणाबाबत सविस्तर चर्चा केली.आदित्य पाटील यांनी राज्यातील जनसामान्यांच्या प्रश्नांबाबत चर्चा केली.
राज्यातील आगामी राजकीय आव्हाने पेलण्यासाठी पक्षश्रेष्ठीं कडून मिळणारे पाठबळ महत्त्वाचे ठरणार असल्याचे आदित्य पाटील यांनी मत व्यक्त केले आहे.



