श्री शिवरामपुरी मठ संस्थान वरपगाव यांच्या वतीने श्री विठ्ठल मंदिर पंढरपूर येथे ह.भ.प. भगवान महाराज वरपगावकर यांची कीर्तन सेवा संपन्न.

केज/प्रतिनिधी
दिनांक 24 सप्टेंबर रोजी नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूर येथे श्री साधू शिवराम पुरी मठ संस्थानचे मठाधिपती महंत ह.भ. प.श्री.भगवान महाराज वरपगावकर यांची कीर्तन सेवा संपन्न झाली.या सेवेसाठी केज परिसरातील साधू शिवरामपुरी मठ संस्थानचे शेकडो भाविकासह भजनी, टाळकरी,मृदंगाचार्य यांची उपस्थिती होती. विश्व वारकरी संघाच्या वतीने,विश्व वारकरी संघाचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प.श्री जगन्नाथ महाराज पंढरपूरकर यांच्या प्रयत्नाने हा भक्ती सोहळा संपन्न झाला.
महंत ह.भ.प.श्री. भगवान महाराज यांनी “स्वल्प वाटे चला जाऊ, वाचे गाऊ विठ्ठल ” या अभंगावर रसभरीत व भावपूर्ण किर्तन सेवा संपन्न झाली. महाराष्ट्राच्या भक्ती संप्रदायाची महती व श्री विठ्ठल नामाची महती अभंग निरूपण करीत असताना सांगितली. पंढरपूर क्षेत्रात हा अविस्मरणीय सोहळा भाविकांनी अनुभवला.
यावेळी श्री जगन्नाथ महाराज देशमुख मठ पंढरपूर येथे ग्रामस्थ मंडळी वरपगाव यांच्या वतीने महाप्रसाद घेऊन भाविक भक्त परतले. याज साठी केला होता अट्टाहास शेवटचा दिस गोड व्हावा या भावनेने भाविकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेऊन भाविक भक्त गावी परतले.



