कृषीसामाजिक

केज तालुक्यात पुन्हा आभाळ फाटले, संततधार मुसळधार पावसाने सोयाबीन व इतर पिके गेली तर पाझर तलाव फुटण्याची भीती 

केज/प्रतिनिधी

दिनांक 26,27 सप्टेंबर च्या दिवशी संततधार मुसळधार पाऊस सतत चालू आहे त्यामुळे केज तालुक्यात शेकडो एकर सोयाबीन पिकाचे शंभर टक्के नुकसान झाले आहे.मांजरा नदीचे पाणी अनेक गावांमध्ये शिरले आहे मांजरा धरण ओव्हरफ्लो झाले आहे अनेक दरवाजे उघडले असून तरी सुद्धा पाणी कळंब शहरा जवळ घुसले आहे.

नदी काठच्या गावात पाणी शिरले असून सोयाबीन पिक तूर, कापुस, ऊस पिकाचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे सोयाबीन पिक हे शंभर टक्के गेले असून शेतकरी आता मोठ्या संकटात सापडला आहे दिवाळी कशी साजरी करणार? असा प्रश्न पडला आहे मागच्या दोन तीन दिवसांपूर्वी अगोदरच अति मुसळधार पाऊस झाला होता त्यात पुन्हा आभाळ फाटले असुन एवढा मोठ्या प्रमाणात पाऊस कधीच झाला नाही घरात पाणी शिरले शेतात कापणीला आलेले पीक पाण्यात सडत आहे जनावरे दगावली आहेत.

सर्व बाजूंनी शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे अजून सुद्धा सरकारी मदत पोंहचली नाही पंचनामे करून सुद्धा सरसकट कर्जमाफी,पन्नास हजार रुपये प्रति हेक्टरी अनूदान दयावे व ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी सर्व शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान प्रशासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे. तसेच सामाजिक संस्था व लोकप्रतिनिधी यांनी सढळ हस्ते मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!