
केज/प्रतिनिधी
राजा राममोहन रॉय हे भारतीय ग्रंथालय चळवळीचे प्रणेते होते असे प्रतिपादन डॉ. वसुदेव बप्पा गायकवाड यांनी केले. दिनांक २७ सप्टेंबर २० २५ रोजी स्वानंद सार्वजनिक वाचनालय आनंदगांव ता.केज जि. बीड येथे राजा राममोहन रॉय यांची जयंती साजरी करण्यात आली.संततधार पावसा मुळे अत्यंत साधेपणाने जयंती साजरी करण्यात आली. सर्वप्रथम राजा राममोहन रॉय यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पुजन व वंदन करण्यात आले.यावेळी ग्रंथालयाचे संस्थापक अध्यक्ष ,जेष्ठ विचारवंत, जेष्ठ समाजसेवक, ख्यातनाम वक्ते ,परखड व्याख्याते,प्राचार्य डॉ. वसुदेव बप्पा गायकवाड बोलत होते.
अध्यक्षस्थानी बाळासाहेब गायकवाड हे होते.प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरपंच रामराजे गायकवाड, बबन पुंड,संजय सोनवणे यांची उपस्थिती होती.सतत च्या पावसामुळे मोजकी वाचक मंडळी कार्यक्रमाला उपस्थित होती .कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सुत्रसंचलन, आभार प्रदर्शन ग्रंथालयाचे आनंदभैय्या गायकवाड यांनी केले.



