क्रिडाशैक्षणिक

केज येथील वसंत कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी प्रविण ढवारे जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम

केज/प्रतिनिधी

केज येथील वसंत कनिष्ठ महाविद्यालयाने जिल्हा स्तरीय कुस्ती स्पर्धेत नेत्रदीपक यश प्राप्त केले असुन या महाविद्यालयाचा इयत्ता अकरावीचा विद्यार्थी प्रविण ढवारे बीड येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत प्रथम आला आहे. त्याच्या या यशाबद्धल संस्थेचे सचिव रमेशराव आडसकर,प्राचार्य प्रकाश धेंडे यांनी अभिनंदन केले आहे.

प्रविण ढवारेच्या या यशाबद्धल त्याचा व त्याचे वडिल मारुती ढवारे यांचा सत्कार प्राचार्य प्रकाश धेंडे, उपप्राचार्य श्री.हेमंत देशमुख,प्रा.शाहूराव साखरे,प्रा.गणेश चाळक, श्री.मोहन बर्डे श्री.जगन्नाथ लामतुरे, विद्यार्थ्याचे मार्गदर्शक प्रा.विठ्ठल समुद्रे ,प्रा. उमाकांत शेटे,पत्रकार धनंजय कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. प्रविण ढवारे याने श्री.रमेशराव आडसकर व प्राध्यापक आणि महाविद्यालयीन कर्मचारी यांचे आभार मानले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!